दिवाळी धमाका! महिंद्रा कंपनीच्या गाड्यांवर भरभक्कम सूट

दिवाळी धमाका! महिंद्रा कंपनीच्या गाड्यांवर भरभक्कम सूट

गेल्या काही महिन्यांमध्ये कार उद्योगांमध्ये मंदी आलीय पण आता सणासुदीच्या, दिवाळीच्या आनंदाच्या दिवसांत कार कंपन्यांनी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : गेल्या काही महिन्यांमध्ये कार उद्योगांमध्ये मंदी आलीय पण आता सणासुदीच्या, दिवाळीच्या आनंदाच्या दिवसांत कार कंपन्यांनी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. महिंद्रा कंपनीच्या कार डीलर्सनी अनेक सवलत योजना आणल्या आहेत.या सवलतीचा फायदा घेऊन गाड्यांची खरेदी वाढेल,अशी या कंपन्यांना आशा आहे.

Mahindra Alturas G4

या गाडीवर 37 हजार रुपयांची सूट आहे. त्याबरोबरच 50 हजार रुपयांचा एक्सेंज बोनस जाहीर करण्यात आलाय.

Mahindra Scorpio

महिंद्रा स्कॉर्पिओ कार 39 हजारांची सवलत आहे.

Mahindra KUV100 Nxt

महिंद्रा KUV100 Nxt या गाडीवर 35 हजार रुपयांची सवलत आहे.

Mahindra Bolero Power Plus

महिंद्रा बोलेरो पॉवर प्लस या कारवर 11 हजार 500 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

(हेही वाचा : सणासुदीच्या दिवसांत सोन्याला झळाळी, चांदीलाही आली चमक, हे आहेत आजचे दर)

Mahindra XUV500

महिंद्रा XUV500 या गाडीवर 40 हजार रुपयांची सूट आहे. त्याचबरोबर एक्सेंज बोनसही देण्यात आलाय.

Mahindra TUV300

महिंद्रा TUV300 या गाडीवर 51 हजार रुपयांची सवलत आहे. महिंद्रा कंपनीच्या गाड्या, एक्सेंज बोनस, अॅक्सेसरीज या सगळ्या सवलतींचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे.

====================================================================================

VIDEO : मास्तर बापाला शाळेत कधी बोलवायचे? अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांचा टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 08:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading