• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • Mahindra कंपनीची अशीही श्रद्धा, म्हणून प्रत्येक गाड्यांच्या नावात 'O' अक्षराचा वापर!

Mahindra कंपनीची अशीही श्रद्धा, म्हणून प्रत्येक गाड्यांच्या नावात 'O' अक्षराचा वापर!

'महिंद्रा'च्या गाड्यांच्या नावात ओ या अक्षराचा वापर हा अगदी योगायोगानं सुरू झाला. अर्थात याला तुम्ही अंधश्रद्धाही म्हणाल.

'महिंद्रा'च्या गाड्यांच्या नावात ओ या अक्षराचा वापर हा अगदी योगायोगानं सुरू झाला. अर्थात याला तुम्ही अंधश्रद्धाही म्हणाल.

'महिंद्रा'च्या गाड्यांच्या नावात ओ या अक्षराचा वापर हा अगदी योगायोगानं सुरू झाला. अर्थात याला तुम्ही अंधश्रद्धाही म्हणाल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : कार (Car) घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सध्याच्या काळात कार ही एक महत्त्वाची गरज बनली आहे. आज बाजारात विविध कंपन्यांच्या कार उपलब्ध आहेत. अर्थात फिचर्सनुसार त्यांच्या किंमतीही वेगवेगळ्या आहेत. महिंद्रा कंपनी (Mahindra Company) तिच्या दणकट आणि स्टायलिश गाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. बोलेरो (Bolero), झायलो (Xylo), स्कॉर्पियो (Scorpio) ही मॉडेल्स अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहेत. मात्र महिंद्रा कंपनीच्या गाड्यांबाबत एक विशेष गोष्ट आहे आणि ती म्हणजे या कंपनीच्या प्रत्येक मॉडेलच्या इंग्रजी नावात 'ओ '(O) या अक्षराचा केला जाणारा वापर. हा एक योगायोग नक्कीच म्हणता येईल. कारण या मागे एक विशेष गोष्ट दडली आहे. महिंद्रा कंपनीच्या बोलेरो, झायलो, स्कॉर्पिओ या लोकप्रिय गाड्यांच्या नावांकडं पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की, या कंपनीच्या प्रत्येक गाडीच्या नावात केला गेलेला 'ओ' या इंग्रजी आद्याक्षराचा वापर. कंपनी आपल्या मॉडेल्ससाठी जाणीवपूर्वक अशी नावं डिझाईन करते की, ज्या नावांच्या अक्षरांमध्ये 'ओ' चा समावेश असेल. अर्थात त्यामागे कारणही तसंच आहे, याबद्दलच वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिली आहे. दलित आणि मुस्लिमांची नावं मतदार याद्यातून गहाळ, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या एका वृत्तानुसार, 'महिंद्रा'च्या गाड्यांच्या नावात ओ या अक्षराचा वापर हा अगदी योगायोगानं सुरू झाला. अर्थात याला तुम्ही अंधश्रद्धाही म्हणाल. जर कंपनी एखादं नवं मॉडेल लॉंच करत असेल आणि त्या मॉडेलच्या नावात 'ओ' या अक्षराचा समावेश केला तर त्या सेगमेंटला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्याची विक्रीही चांगली होते, असा कंपनीला विश्वास आहे. ही बाब कंपनीच्या एका अधिकाऱ्यानं स्पष्ट केली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, 'बोलेरो आणि स्कॉर्पिओ या यशस्वी मॉडेल्सनंतर कंपनीनं गाड्यांची नावं 'ओ' या अक्षरानं समाप्त करणं सुरू केलं. असं करणे कंपनीसाठी लाभदायक ठरु लागलं आणि हिच परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय कंपनीनं घेतला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची अंधश्रद्धा आहे, असं काहींना वाटू शकतं. पण आमच्यासाठी असा बदल लाभदायक ठरला', असं महिंद्रा अँड महिंद्रा ऑटोमोटिव्ह अँड फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितलं. 'ओ' अक्षराचा गाडीच्या नावात वापर करणं ही आता आमची परंपरा झाली आहे. यापुढेही कंपनी ही परंपरा सुरुच ठेवणार आहे. ओ या अक्षराच्या वापरामुळे ग्राहकांना महिंद्राची गाडी सहजपणे ओळखणं शक्य होतं', असंही गोयंका यांनी स्पष्ट केलं. बापरे! प्रायव्हेट पार्टच शरीरावेगळा केला; शार्कचा भयंकर हल्ला, तरुणाचा मृत्यू होंडाच्या (Honda) गाड्यांबाबतही असा अनुभव आला आहे. होंडाच्या काही गाड्यांची नावं ट्विस्टर (Twister), स्टनर (Stunner), डॅझलर (Dazzler) अशी आहेत. महिंद्रा कंपनीच्या गाड्यांची नावं पाहिली तर बोलोरो, स्कॉर्पिओ, झायलोओ, ई2ओ, क्वांटो, व्हर्टीओ आदी नावांमध्ये शेवटचं अक्षर हे 'ओ' येतं. महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 किंवा 500 या गाड्यांच्या नावातही शेवट ओ येतं. महिंद्रा कंपनीनं 'ओ'या अक्षराचा वापर केवळ चारचाकीच नव्हे तर ड्युरो (Duro), रोडिओ (Rodeo), स्टॅलिओ (Stallio), पेन्ट्रो (Pantero) या दुचाकीच्या नावांमध्येही केला आहे. या गोष्टींवर विश्वास ठेवायचा की अंधश्रद्धा मानायचं हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. पण जर यश येत असेल तर कुणीही बदल स्वीकारेल.
  First published: