Home /News /auto-and-tech /

अपघातापूर्वीच असा मिळणार अलर्ट; वाचा या Car च्या जबरदस्त फीचरबाबत

अपघातापूर्वीच असा मिळणार अलर्ट; वाचा या Car च्या जबरदस्त फीचरबाबत

कंपनी आता रियल-टाईम ट्रॅफिक वॉर्निंग सिस्टमवर काम करत आहे, ज्यात कारचे टायर्स आणि ड्रायव्हरला एखादी दुर्घटना होण्याआधीच अलर्ट मिळेल आणि वेळेपूर्वीच हा धोका टाळता येऊ शकतो.

  नवी दिल्ली, 5 जुलै : जगातील लक्झरी कार्सपैकी एक असलेल्या Porsche कारमध्ये एक जबरदस्त फीचर सामिल होणार आहे. ज्यात अपघातापूर्वीच ड्रायव्हरला अलर्ट दिला जाईल. पोर्शे आणि वोडाफोन, HERE टेक्नोलॉजीजसह मिळून एका तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याच्या मदतीने रोड सेफ्टी इन्प्रुव्ह करण्यासाठी आणि अपघात कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी कंपनी अचूक, रियल-टाईम, 5G टेक्नोलॉजी आणि ट्रॅफिकच्या परिस्थितीनुसार लोकलायजेशनवर अभ्यास करत आहे. कंपनी आता रियल-टाईम ट्रॅफिक वॉर्निंग सिस्टमवर काम करत आहे, ज्यात कारचे टायर्स आणि ड्रायव्हरला एखादी दुर्घटना होण्याआधीच अलर्ट मिळेल आणि वेळेपूर्वीच हा धोका टाळता येऊ शकतो. या रियल-टाईम ट्रॅफिक वॉर्निंग सिस्टमचं टेस्टिंग आता जर्मनीच्या एल्डेनहोवनमध्ये वोडाफोन 5G मॉबिलिटी लॅबमध्ये केलं जात आहे. इथे विविध परिस्थितीत याचं टेस्टिंग सुरू आहे. या सिस्टमची गरज का? अनेकदा कार चालवताना अशी स्थिती समोर येते, जी ड्रायव्हर आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि दुर्घटना होते. हे सिस्टम पोजिशनिंग टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंन्स आणि हाय-डेफिनेशन मॅपवर काम करेल. कॅमेरा आणि सेंसर सिस्टमच्या मदतीने हे कॅप्चर करता येईल. या कॅप्चर डेटाचं मल्टी-अॅक्सेस एज कंप्युटिंगच्या माध्यमातून रस्त्याचं मूल्यांकन केलं जातं, ज्याला 5G टेक्नोलॉजी आणि इंटेलिजेंन्स MQTT च्या मदतीने दुर्घटनेपूर्वीच ड्रायव्हरपर्यंत पोहोचवलं जातं.

  (वाचा - Aadhaar Cardअपडेट करणं आता आणखी सोपं;हेल्पलाईनवर करा तक्रार, सोडवली जाईल समस्या)

  रियल-टाईम स्थिती - या सिस्टममध्ये पोजिशनिंग टेक्नोलॉजी, HD मॅप्स आणि लाईव्ह सेन्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किटचा वापर होईल आणि ड्रायव्हिंगवेळी रस्त्यावर खराब परिस्थितीची माहिती मिळेल. हे सिस्टम ड्रायव्हर्सच्या फ्रंट-फेसिंग कॅमेरा डिव्हाईसला जोडलं जाईल, ज्याच्या मदतीने युजर्सच्या ड्रायव्हिंगमध्ये बदल होईल आणि रस्त्यावर निर्माण झालेल्या धोकादायक स्थितीची ओळख होईल. या सिस्टमचं आता वोडाफोन लॅबमध्ये टेस्टिंग चालू आहे.
  Published by:Karishma
  First published:

  पुढील बातम्या