मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

गॅलॅक्सी एस 21 सीरिज आज लाँच होणार? ग्राहकांमध्ये उत्सुकता

गॅलॅक्सी एस 21 सीरिज आज लाँच होणार? ग्राहकांमध्ये उत्सुकता

गॅलॅक्सी एस 21 आणि एस 21 प्लस ही दोन्ही मॉडेल्स 8 जीबी रॅमची असतील. त्यात 128 जीबी आणि 256 जीबी असे स्टोरेजचे दोन पर्याय असतील.

गॅलॅक्सी एस 21 आणि एस 21 प्लस ही दोन्ही मॉडेल्स 8 जीबी रॅमची असतील. त्यात 128 जीबी आणि 256 जीबी असे स्टोरेजचे दोन पर्याय असतील.

गॅलॅक्सी एस 21 आणि एस 21 प्लस ही दोन्ही मॉडेल्स 8 जीबी रॅमची असतील. त्यात 128 जीबी आणि 256 जीबी असे स्टोरेजचे दोन पर्याय असतील.

मुंबई, 14 जानेवारी :'गॅलॅक्सी अनपॅक्ड 2021' (Galaxy Unpacked 2021) हा कार्यक्रम आज (14 जानेवारी) भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता प्रसारित केला जाणार असल्याचं सॅमसंगकडून जाहीर करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं लाइव्हस्ट्रीम Samsung Newsroom India, Samsung.com यावर उपलब्ध असेल. या इव्हेंटचा फ्लिपकार्ट टीझर (Teaser) ऑनलाइन झळकला असून, त्यात 'नोटिफाय मी' हा ऑप्शनही देण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये कंपनी बहुप्रतीक्षित गॅलॅक्सी एस 21 सीरिज सादर करण्याची शक्यता आहे. या सीरिजमध्ये गॅलॅक्सी एस 21, गॅलॅक्सी एस 21 प्लस आणि गॅलॅक्सी एस 21 अल्ट्रा या स्मार्टफोन मॉडेल्सचा समावेश आहे. नव्याने दाखल होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) आयताकृती कॅमेरा मोड्युल असून, त्यात ट्रिपल कॅमेरा सेटप असेल, असं कंपनीने प्रसिद्ध केलेल्या छोट्या व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे. फर्स्टपोस्टने याबाबतचं वृत्त दिलं आहे. 'गॅलॅक्सी अनपॅक्ड 2021' या इव्हेंटसाठी सॅमसंगने (Samsung) अलीकडचे काही टीझर्स प्रसिद्ध केले. त्या टीझर्समधून नेमकं काही स्पष्ट होत नाही; पण त्यात पर्पल कलरच्या व्हॅरिएंटची किंवा स्मार्टफोनच्या डिस्प्लेची एक झलक असावी. हा टीझर ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. गॅलॅक्सी एस 21 (Galaxy S 21 Series) या सीरिजमध्ये कोणती स्पेसिफिकेशन्स अपेक्षित आहेत? विनफ्युचर डॉट डीई या जर्मन पब्लिकेशनच्या माहितीनुसार, सॅसमंग गॅलॅक्सी एस 21मध्ये 4000 मिलिअॅम्पिअर पर अवर (mAh) क्षमतेची बॅटरी असेल. गॅलॅक्सी एस 21 प्लस या मॉडेलमध्ये 4800 मिलिअॅम्पिअर पर अवर क्षमतेची बॅटरी असेल. अमेरिकेसाठीच्या मॉडेल्समध्ये स्नॅपड्रॅगन 888 एसओसी चिपसेट असेल, तर युरोपासाठीच्या मॉडेल्समध्ये एक्सिनोज 2100 चिपसेट असेल. या मॉडेल्समध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि वन यूआय 3.1 असेल. दोन्ही स्मार्टफोन्स ड्युएल सिम (नॅनो) सुविधेचे असतील., यातील सर्वांत कमी किमतीच्या मॉडेलला 6.2 इंची फुल एचडी (HD) आणि इन्फिनिटी ओ डायनॅमिक अॅमोएलईडी (AmoLED) स्क्रीन असेल. ऑल्वेज ऑन डिस्प्ले, गोरिला ग्लास (Gorilla Glass Protection) प्रोटेक्शन, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट, 1300 निट्स ब्राइटनेस आणि 421 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी ही त्याची वैशिष्ट्यं असतील. प्लस मॉडेलचा स्क्रीन 6.7 इंची फुल एचडी आणि इन्फिनिटी ओ डायनॅमिक अॅमोएलईडी असेल आणि ऑल्वेज ऑन डिस्प्ले सुविधा असेल. पिक्सेल डेन्सिटी 394 पीपीआय असेल आणि बाकीची स्पेसिफिकेशन्स सारखीच असतील. गॅलॅक्सी एस 21 आणि एस 21 प्लस ही दोन्ही मॉडेल्स 8 जीबी रॅमची असतील. त्यात 128 जीबी आणि 256 जीबी असे स्टोरेजचे दोन पर्याय असतील. दोन्ही फोन्सना 12 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64 मेगापिक्सेलची टेलिफोटो लेन्स असे तीन कॅमेरे मागच्या बाजूला असतील. या लेन्सेसना ऑटो फोकस टेक्नॉलॉजी, तिप्पट हायब्रिड ऑप्टिकल झूम आणि फेज डिटेक्शन ऑटोफोकस ही फीचर्स असतील. दोन्ही फोन्सना सेल्फी कॅमेरे 10 मेगापिक्सेलचे असतील. एस 21 सीरिजमधी फोन्सना फाइव्ह जी कनेक्टिव्हिटीची सुविधा असेल. तसंच, यूएसबी सी पोर्ट, ब्लूटूथ 5.0 या सुविधाही असतील. एस 21ला ग्रे, व्हाइट, पिंक आणि पर्पल असे रंगांचे पर्याय असतील, तर प्लस मॉडेलला सिल्व्हर, ब्लॅक आणि पर्पल असे रंगांचे पर्याय असतील. किमती? '91 मोबाइल्स'च्या माहितीनुसार, गॅलॅक्सी एस 21च्या 128 जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 849 युरो म्हणजेच अंदाजे 76 हजार रुपये असू शकेल. एस 21 प्लसच्या 128 जीबी मॉडेलची किंमत 1049 युरो (94 हजार रुपये), तर 512 जीबी मॉडेलची किंमत 1099 युरो (98 हजार रुपये) असू शकेल. गॅलॅक्सी एस 21 अल्ट्राच्या 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 1399 युरो म्हणजेच सव्वा लाख रुपये असू शकेल.
First published:

पुढील बातम्या