Home /News /auto-and-tech /

तुमच्या हक्काच्या बाईकवरुन घ्या रायडिंगचा आनंद; KTM 250 Adventure भारतात लाँच होणार

तुमच्या हक्काच्या बाईकवरुन घ्या रायडिंगचा आनंद; KTM 250 Adventure भारतात लाँच होणार

नवीन वर्षात तुम्हाला बाईक रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल तर KTM 250 Adventure तुमच्यासाठी खूपच चांगला पर्याय आहे.

    मुंबई, 12 नोव्हेंबर: भारतामध्ये लवकरच KTM 250 Adventure ही बाईक लाँच होणार आहे. केटीएम 250 ॲडव्हेंचरचं अनऑफिशियल बुकिंग सुरू झाल्याचेही सांगण्यात आले आहे. या फोटोंमध्ये 250cc ड्युअल स्पोर्ट्स मोटरसायकल केशरी रंगामध्ये दिसून येत आहे. तसंच कंपनीने दिलेल्या अहवालानुसार या बाईकचा ब्लॅक व्हेरिएंट सुद्धा उपलब्ध करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. केटीएम 250 ॲडव्हेंचरमध्ये 5.0 इंचाची टीएफटी ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन दिसते आहे. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की या बाईकची किंमत किमान अडीच लाख रुपयांच्या आसपास असेल. तसेच या बाईकवर बसण्यासाठी स्प्लिट सीटची व्यवस्था असणार आहे. मागच्या सीटवर बसणाऱ्याला हात धरायला रेलिंगही असणार आहेत. ही गाडी विशेषतः रायडर्सच्या सोयीसाठी त्यांना सोपे व आरामदायीरित्या चालवता यावी याकरता डिझाईन केली आहे. तसेच ही गाडी लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी देखील आरामदायी वाटेल अशी आहे. तसेच यामध्ये सिंगल सिलेंडर, लिक्विड कूल्ड इंजिन दिले गेले आहे. तसेच ट्रान्समिशन साठी 6-speed गिअर बॉक्स सुद्धा देण्यात आलेला आहे. केटीएम 250 ॲडव्हेंचर फ्युअल इंजेक्शन सोबत देण्यात येणार आहे. जी 30bph आणि 24Nm पीक टॉर्कसह उपलब्ध होणार आहे. तसंच या बाईकचे टायर हे पूर्वीपेक्षा स्लिम आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार सर्व केटीएम 250 या महिन्याच्या अखेरीस बहुदा लाँच होतील.‌ या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही बाइक बाजारात येण्याचा अंदाज वर्तविला जात होता. परंतु आरटीओ होमोलोगेशन प्रक्रियेतील काही गोष्टी उशिरा झाल्यामुळे हा लाँच पुढे ढकलावा लागला आहे असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. लवकरात लवकर या बाईकचा लाँचसुद्धा होईल व बुकिंगसुद्धा सुरू होईल. ही गाडी लवकरच आपल्याला रस्त्यांवर धावताना दिसेल. रायडर्सचा विचार करून डिझाईन केलेली ही बाइकची  टायर स्लिम आणि बसण्यासाठी उत्तम सीट आहेत. त्यामुळे ही बाईक तुम्हाला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नेण्यास सुद्धा काहीच हरकत नाही.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    पुढील बातम्या