Explainer : नवी कार खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत? मग कार Subscription हा पर्याय तुम्ही वापरू शकता

Explainer : नवी कार खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत? मग कार Subscription हा पर्याय तुम्ही वापरू शकता

सध्या अनेक जणं नवी कार विकत घेण्याऐवजी कार सबस्क्रिप्शन किंवा ती भाड्याने घेऊन वापरतात. आर्थिक फायदा तर आहेच पण खासगीपणा, सुरक्षितता, लवचिकता आणि सोय हे पण कार सबस्क्रिप्शन सेवेचे फायदे आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल: काही वर्षांपूर्वी कारने प्रवास करण्यासाठी एकतर स्वत:ची नवी कार विकत घ्यायला (New car buying) लागायची, दुसरा पर्याय सेकंड हॅण्ड कार विकत घेणं किंवा मित्राकडून तात्पुरती चालवायला कार मागणं (borrow car from friend). पण काही जणांना कार घेणं परवडत नाही. तसंच उधारीने कार वापरणं हे आणखी कटकटीचं असतं. त्यामुळेच कार सबस्क्रिप्शन मॉडेल आणि थोड्या कालावधीसाठी कार घेता येण्याची सुविधा देणारं मॉडेल बाजारात आलं.

सध्या अनेक जणं नवी कार विकत घेण्याऐवजी कार सबस्क्रिप्शन किंवा ती भाड्याने घेऊन वापरतात. आर्थिक फायदा तर आहेच पण खासगीपणा, सुरक्षितता, लवचिकता आणि सोय हे पण कार सबस्क्रिप्शन सेवेचे फायदे आहेत. त्यामुळेच जाणून घेऊया कार सबस्क्रिप्शन मॉडेल कसं काम करत ते…

कार सबस्क्रिप्शन (car subscription) काय असतं?

दरमहा शुल्क भरून एखादी कार वापरण्याची परवानगी देणारी सुविधा म्हणजे कार सबस्क्रिप्शन. डाउनपेमेंट, मासिक हप्ते, गाडीचा मेंटेनन्स, इन्शुरन्स यापैकी कशाचाही भार न उचलावा लागता ग्राहकाला कार वापरता येते. त्याबदल्यात त्यांना एक मासिक फी भरावी लागते. या फीमध्ये मेंटेनन्स, इन्शुरन्स, रोड साइड असिस्टन्स या सेवांचा समावेश असतो.

आणखी एक फायदा म्हणजे ग्राहकांना त्याच्या आवडीची कार खरेदी न करताही वापरता येते. जर कुणाला जास्त कालावधीसाठी कार हवी असेल तर तो त्या काळासाठी गाडी भाड्याने घेऊ शकतो जर एखाद्याला 12 महिन्यांसाठी कार हवी असेल तर शॉर्ट टेन्युअर ऑपरेटिंग लिजवर घेऊ शकतो.

हे पण पाहा : Explainer : Facebook Data Leak नेमकं काय आहे प्रकरण; या डेटाचं काय होतं, कसं सुरक्षित ठेवाल तुमचं अकाउंट

कार सबस्क्रिप्शन/भाड्यानी घेणं(car subscription/leasing) सेवा कशी चालते?

ग्राहकांना मासिक किंवा वार्षिक फी भरून कार सबस्क्रिप्शन सेवावापरता येते. तुम्हाला पेट्रोलचे पैसे भरावे लागतात त्या कारसंबंधी इतर सर्व बाबींची काळजी भाड्याने देणारी कंपनी घेते. हे भाड्याने कार घेण्याचे प्लॅन्स 12, 24, 36, 48 आणि 56 महिन्यांचे असतात ग्राहक त्यांच्या गरजेनुसार प्लॅन निवडू व त्याची मर्यादा कमी-जास्त करू शकतात. त्यामुळे बलेनो चालवणारी व्यक्ती आता इको स्पोर्ट कार चालवू शकते.

कार सबस्क्राइब कधी आणि कोण करतं?

कारचे मालकही सुट्टीत फिरायला जायला, बिझनेस ट्रिपसाठी किंवा गाडी दुरुस्तीला टाकल्यावर भाड्याच्या कारचा वापर करू शकतात.

कारवेड्या व्यक्तीला आलिशान कार चालवण्याची आतुर इच्छा कशी टाळता येईल?

कारवेड्या व्यक्तीला ही सबस्क्रिप्शन सुविधा वापरून त्याच्या मनातली आलिशान कार चालवण्याचा आनंद लुटता येऊ शकतो आणि ते फार खर्चिकही(cheaper)ठरत नाही. कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम जाणाऱ्यांसाठी हा पर्याय उत्तम आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे नव्या शहरात गेल्यावर आपली कार ट्रान्सपोर्ट करण्याऐवजी कार भाड्यानी घेणं उत्तम आणि सोयीचं.

या लेखातल्या मतांचा विचार केल्यास कार विकत घेण्याऐवजी कार सबस्क्रिप्शन सेवा घेण्याचा कल हळूहळू वाढतो आहे. ग्राहकांच्या वागण्यातला हा महत्त्वाचा बदल कार भाड्याने देणाऱ्या कंपन्यांच्या लक्षात आला आहे. एकट्याची वस्तू किंवा ओटीटी सबस्क्रिप्शन वापरण्याऐवजी नेटफ्लिक, स्पॉटिफाय (Netflix, Spotify) सारखी सबस्क्रिप्शन अनेकांनी एकत्रितपणे वापरण्याकडे समाजाचा कल दिसून येतो आहे. तसंच कारबाबतही होतंय.

त्याचवेळी ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची सेवा हवी आहे. हा ट्रेंड जगभरातच वाढत आहे तो लक्षात घेतला तर जगभरातील ऑटोमोबाईल रेंटल आणि लिजिंग मार्केट 2025 पर्यंत 492.6 बिलियन डॉलरपर्यंत व्यवसाय करेल असा अंदाज आहे. या नव्या सेवांमुळे सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक आणि खासगी प्रवासाच्या कल्पनाच काही वर्षांत पूर्णपणे बदलून जातील.

DISCLAIMER: हा लेख Avis Indiaचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल गुप्ता यांनी लिहिलेला आहे आणि सर्व त्यांची वैयक्तिक मते आहेत.

First published: April 14, 2021, 12:06 PM IST
Tags: car

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading