मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Jio ग्राहकांसाठी सिक्रेट! इंटरनेट डेटा वाचवायचा असेल तर फक्त तुमच्या तुम्हीच करू शकता या 4 गोष्टी

Jio ग्राहकांसाठी सिक्रेट! इंटरनेट डेटा वाचवायचा असेल तर फक्त तुमच्या तुम्हीच करू शकता या 4 गोष्टी

फक्त VIDEO सुरू असताना डेटा सेटिंग्ज बदलली की, तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डेटा वाचवू शकता. अनेकांना ही ट्रिक माहिती नसते. जाणून घ्या ते कसं करायचं?

फक्त VIDEO सुरू असताना डेटा सेटिंग्ज बदलली की, तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डेटा वाचवू शकता. अनेकांना ही ट्रिक माहिती नसते. जाणून घ्या ते कसं करायचं?

फक्त VIDEO सुरू असताना डेटा सेटिंग्ज बदलली की, तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर डेटा वाचवू शकता. अनेकांना ही ट्रिक माहिती नसते. जाणून घ्या ते कसं करायचं?

  मुंबई, 2 जानेवारी: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ(Reliance Jio) आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळ्या सुविधा आणत असते. अनेक प्लॅनमध्ये जिओ(Jio) आपल्या ग्राहकांना अनेक ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मची मोफत सब्स्क्रिप्शन देखील देत असते. त्याचबरोबर जिओच्या विविध सेवा देखील मोफत आहेत. यामध्ये Jio Cinema ही सेवा देखील मोफत आहे. यामध्ये ग्राहक कोणताही चित्रपट मोफत पाहू शकतात. यासाठी कोणतेही अतिरिक्त चार्ज मोजावे लागत नाही. मागील काही वर्षांपासून जिओ ही सेवा आपल्या ग्राहकांसाठी मोफत देत असून यामधे अनेक फिचर आहेत.

  या अ‍ॅपमधून सिनेमा पाहत असताना मोठ्या प्रमाणात डेटा (Data) खर्च होतो. परंतु आता कंपनीने यासाठी फिचर दिल असून यामध्ये तुम्ही व्हिडिओची क्वालिटी (Video Quality) बदलून तुमच्या डेटाची बचत करू शकता. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नसून केवळ व्हिडीओ सुरू असताना क्वालिटी सेट करायची आहे. अनेकांना हे फीचर माहिती नसून आज आम्ही तुम्हाला याची माहिती सांगणार आहोत.

  या सोप्या पद्धतीने वाचवू शकता डेटा

  1)Jio Cinema ओपन करा

  2) यामधील कोणताही एक व्हिडीओ सुरू करा

  3)व्हिडीओ सुरू झाल्यानंतर वर तुम्हाला सेटिंग हा पर्याय दिसेल

  4) यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला Auto, Low, Medium आणि High असे पर्याय येतील.

  5) यामध्ये तुम्ही ऑटो हा पर्याय निवडल्यास तुमचा व्हिडीओ आहे त्या क्वालिटीचा दिसणार आहे. त्याचबरोबर तुम्ही लो ही क्वालिटी निवडल्यास एक तास व्हिडिओं पाहण्यासाठी तुमचा 0.17GB डेटा खर्च होणार आहे. तर मीडिअम क्वालिटी निवडल्यास एक तास व्हिडिओं पाहण्यासाठी तुमचा 0.51 GB डेटा तर हाय क्वालिटी निवडल्यास एक तास व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा 1GB डेटा खर्च होणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Reliance Jio