Amazon- Jio Partnership: जिओच्या ग्राहकांना मिळणार 1 वर्ष Amazon Prime Video फुकट, काय आहेत अटी?

Amazon- Jio Partnership: जिओच्या ग्राहकांना मिळणार 1 वर्ष  Amazon Prime Video फुकट, काय आहेत अटी?

jio ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली असून, यामध्ये जिओच्या ग्राहकांना मोफत amazon prime video पाहायला मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : विविध टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी सुविधा देत असतात. अनलिमिटेड रिचार्जवर airtel, idea आणि jio सारख्या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध योजना देत असतात. त्याचबरोबर अनेक मोफत सुविधादेखील पुरवत असतात. आता jio ने आपल्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली असून, यामध्ये जिओच्या ग्राहकांना मोफत amazon prime video पाहायला मिळणार आहे. यासाठी रिलायन्स जिओनी अमेझॉनशी करार केला आहे. त्यामुळे आता jio वापरणाऱ्या ग्राहकांना ही सुविधा मोफत मिळणार आहे. मात्र यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सुविधा केवळ जिओच्या पोस्ट पेड ग्राहकांना मिळणार आहे. यासाठी या ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही.

जिओने 399 रुपयांचा पोस्टपेड असणाऱ्या ग्राहकांना ही नवीन सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये ग्राहकांना एक वर्ष मोफत 999 रुपयांचा amezon prime चा हा प्लॅन मिळणार आहे. याविषयी माहिती देताना अमेझॉन प्राइम इंडियाचे प्रमुख अक्षय साही म्हणाले, 'जिओ बरोबर झालेल्या या करारामुळे ग्राहकांना याचा मोठा लाभ होणार आहे. यामार्फत ग्राहकांची मोठी बचतदेखील होणार असून त्याच्या मनोरंजनामध्ये देखील भर पडणार आहे. जिओ नेटवर्क संपूर्ण भारतात असल्याने आम्ही अमेझॉनबरोबर हा करार करून देशभरातील सर्वच ग्राहकांना ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.'

याचबरोबर 10 भाषांमध्ये ग्राहकांना विविध कंटेंट पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर 1000 हून अधिक पुस्तकं देखील ऑनलाईन वाचायला मिळणार असल्याची माहिती अमेझॉन प्राइम व्हिडीओचे डायरेक्टर गौरव गांधी यांनी दिली आहे. अमेझॉनबरोबर केलेल्या भागीदारीमुळे जिओच्या ग्राहकांना मोठा लाभ होणार असल्याचं रिलायन्स जिओचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी म्हटलं आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे आम्ही ग्राहकांसाठी नवीन सुविधा आणली असून ग्राहक आपला प्लॅन बदलून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात, असेही दत्त यांनी स्पष्ट केले.

अमेझॉन प्राइमवर विविध भाषांतील कन्टेन्ट उपलब्ध असून यामध्ये वेब सीरिज, सिनेमे आणि गाण्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर अमेझॉन प्राइम मेंबर झाल्यास अमेझॉनकडून विविध सेवा मोफत मिळतात. यामध्ये अनलिमिटेड फ्री शिपिंग, प्राइम व्हिडिओमध्ये पुरस्कार विजेते सिनेमे आणि टीव्ही मालिकांचा अनलिमिटेड अक्सेसदेखील मिळत आहे.

Published by: Manoj Khandekar
First published: September 24, 2020, 9:27 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading