जीपच्या कंपास या मॉडेलवर मिळत आहे 3 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट

विविध कंपन्या आपल्या गाड्यांवर भरघोस सूट देत असून जीप(jeep) या अमेरिकन वाहन कंपनीने देखील आपल्या वाहनांवर मोठी सूट दिली आहे.

विविध कंपन्या आपल्या गाड्यांवर भरघोस सूट देत असून जीप(jeep) या अमेरिकन वाहन कंपनीने देखील आपल्या वाहनांवर मोठी सूट दिली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : कोरोनाच्या(covid 19) या संकटकाळात वाहन विक्रीवर मोठा प्रभाव पडला आहे. त्याचबरोबर यावर्षी सणासुदीत देखील गाड्यांची विक्री झालेली नाही. त्यामुळे विविध कंपन्या आपल्या गाड्यांवर भरघोस सूट देत असून जीप(jeep) या अमेरिकन वाहन कंपनीने देखील आपल्या वाहनांवर मोठी सूट दिली आहे. 31 डिसेंबरपर्यंत कंपनीने आपल्या कंपास (jeep compass) या मॉडेलवर मोठी सूट दिली आहे. विविध प्रकारचा डिस्काउंट यामध्ये मिळत असून कॅश डिस्काउंट,(cash discount) एक्स्चेंज बोनस,(exchange bonus) कॉर्पोरेट बोनस(corporate bonus) तसेच गाडीबरोबर कॉम्प्लिमेंटरी ॲक्सेसरीज देखील मिळणार आहे. साधारणपणे ॲक्सेसरीज घेण्यासाठी आपल्याला वेगळे पैसे मोजावे लागतात. परंतु या कालावधीत कंपनी हे फ्रीमध्ये देणार आहे. जीप कंपास(jeep compass) या गाडीवर ग्राहकांना 1 लाख 8 हजार रुपयांपर्यंतचा कॅश डिस्काउंट मिळत आहे. तर 50,000 रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनस, 20,000 रुपयांचा लॉयल्टी बोनस तर 50,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज मोफत मिळणार आहेत. पण जीपच्या केवळ कंपास या गाडीवर ही सूट मिळत असून कारवाले डॉटकॉमच्या रिपोर्टनुसार जीपच्या रँग्लर या गाडीवर ही सूट मिळणार नाही. जीप कंपासमध्ये 2.0 लिटरचे मल्टीजेट डिझेल इंजिन तसेच ड्युअल-झोन स्वयंचलित हवामान नियंत्रित करणारी टेक्नॉलॉजी, रिव्हर्स पार्क असिस्ट सेंसर आणि पुढील आणि मागील प्रवाश्यांसाठी पूर्ण लांबीचे पडदे देखील या गाडीमध्ये मिळणार आहेत. त्याचबरोबर अनेक एअरबॅग देखील मिळणार असून साइड एअरबॅग, त्याचबरोबर ड्रायव्हरच्या बाजूला सुरक्षेसाठी स्टेज आणि फ्रंट पॅसेंजर एअरबॅग देखील मिळणार आहे. कंपनी कंपासच्या फेसलिफ्ट(facelift ) या मॉडेलवर काम करत असून विविध ठिकाणी टेस्टिंग मॉडेल्स देखील दिसून आल्या आहेत. 2020 च्या गुआंगझो ऑटो शोमध्ये (Guangzhou Auto Show) या कारच्या चायना मॉडेलचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच भारतात देखील ही गाडी विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार असून पुढील वर्षापर्यंत भारतीय बाजारात ही गाडी येण्याची अपेक्षा आहे. या कारची लांबी आणि उंची 29 मिमी आणि 17 मिमीने वाढवण्यात आली आहे. गाडीचे व्हीलबेसन सध्याच्या मॉडेलसारखेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हेडलॅम्प्स एलईडी डीआरएल मध्ये देण्यात आले आहेत. पुढचा बम्पर रीशेप्ड एअर इनलेट्स आणि चंदेरी रंगाच्या प्लेट्ससह देण्यात आला आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published: