मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Instagram चं खास फीचर! मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार गायब, अशाप्रकारे करा वापर

Instagram चं खास फीचर! मेसेज वाचल्यानंतर आपोआप होणार गायब, अशाप्रकारे करा वापर

 फेसबुकने (Facebook) आपल्या इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया अ‍ॅपसाठी नवीन फीचर आणलं आहे. कंपनीने आपल्या व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) या अ‍ॅपमधील ‘Disappearing Message’ याप्रमाणेच इंस्टाग्रामसाठी ‘Vanish Mode’  हे नवीन फीचर आणले आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 30 डिसेंबर: फेसबुकने (Facebook) आपल्या इंस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया अ‍ॅपसाठी नवीन फीचर आणलं आहे. कंपनीने आपल्या व्हाट्सअ‍ॅप (WhatsApp) या अ‍ॅपमधील ‘Disappearing Message’ याप्रमाणेच इंस्टाग्रामसाठी ‘Vanish Mode’  हे नवीन फीचर आणले आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर तुमचे मेसेज तात्काळ आपोआप डिलीट होणार आहेत. हे फीचर ऑन केल्यानंतर तुम्ही कुणालाही पाठवलेले मेसेज समोरील व्यक्तीला गेल्यानंतर आणि त्याने पाहिल्यानंतर आपोआप डिलीट होणार आहेत. यासाठी तुम्हाला नसून केवळ हे फीचर ऑन करण्याची आवश्यकता आहे. हे फीचर व्हाट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) Disappearing Message’ प्रमाणेच आहे. परंतू WhatsApp वर मेसेज 7 दिवसांनंतर डिलीट होतात तर इंस्टाग्रामच्या (Instagram) ‘Vanish Mode’ मध्ये समोरील व्यक्तीने मेसेज पाहिल्यानंतर तात्काळ डिलीट होणार आहेत. त्यामुळं तुम्हाला 7 दिवस वाट पाहायची गरज नाही भासणार. शिवाय हे फीचर वापरण्यासाठी तुमच्याकडं नवीन लेटेस्ट अपडेटेड अ‍ॅप असणं गरजेचं आहे. या फीचरचा वापर कसा करावा याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. या पद्धतीने वापरा हे ‘Vanish Mode’ -तुम्ही इन्स्टाग्राम उघडल्यानंतर यामध्ये कोणतीही चॅट विंडो ओपन करून त्यामध्ये स्वाईप-अप करून थोडावेळ थांबा -यामुळं तुमचा ‘Vanish Mode’ ऑन होऊन तुम्ही याचा वापर करू शकता. महत्त्वाचे म्हणजे हे फीचर रिसिव्हर आणि सेंडर दोघांसाठी ऑन होणार आहे. (हे वाचा-Amazon Mega Salary Days: 2021मधील पहिल्या सेलची घोषणा,TV-लॅपटॉपवर मिळवा बंपर सूट) -यानंतर तुम्ही पाठवलेला मेसेज समोरील व्यक्तीने पाहिल्यानंतर आपोआप गायब होणार आहे. त्यामुळं तुम्हाला प्रत्येक मेसेज डिलीट करावा लागणार नाही. अशाप्रकारे बंद करू शकता Vanish Mode याचबरोबर तुम्ही हा Vanish Mode ऑफ देखील करू शकता. यासाठी चॅट विंडोवर जाऊन पुन्हा एकदा स्वाईप अप करायचं आहे. त्याचबरोबर चॅट विंडो बंद केल्यानंतर देखील तुमचे हे फिचर आपोआप बंद होणार आहे. त्यामुळं या फीचरचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. (हे वाचा-आठवड्याला LPG गॅस सिलेंडरचे दर बदलणार का? या प्रश्नावर सरकारचा खुलासा) सुरुवातीला अमेरिका आणि इतर देशांमध्ये कंपनीने हे फीचर उपलब्ध करून दिलं होतं. परंतु आता भारतातील युजर्ससाठी देखील हे फीचर उपलब्ध करून देण्यात आलं असून इन्स्टाग्रामवरून (Instagram) चॅटिंग करणाऱ्यांसाठी हे फीचर खूप महत्त्वाचं ठरणार आहे. हे फीचर एंड टू एंड एन्क्रिप्टेड (end-to-end encrypted ) असल्यानं सुरक्षित आहे. यामुळं युजर्सची डेटा सुरक्षित राहणार असून कुणीही याच्याशी छेडछाड करू शकणार नाही.
First published:

Tags: Instagram

पुढील बातम्या