Elec-widget

Instagramचा आता Tik Tok अवतार! जाणून घ्या काय आहे नवा अपडेट

Instagramचा आता Tik Tok अवतार! जाणून घ्या काय आहे नवा अपडेट

Tik Tokला Instagram देणार टक्कर!

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग सर्विस इन्स्टाग्रामनं आता एक नवीन अपडेट आणला आहे. यामुळं टिक टॉकचे चाहते आता इन्स्टाग्रामकडे वळू शकतात. याआधी फक्त फोटो काढण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी वापरण्यात येणारे इन्स्टाग्राम आता गाण्यासह व्हिडीओ तयार करण्यासाठी वापरले जाऊ शकते.

इन्स्टाग्रामनं आणलेल्या या नव्या टूलचे नाव आहे रील्स. या टूलचा वापर करून आता तुम्ही इन्स्टाग्रामवरही टिक-टॉकसारखे व्हिडीओ तयार करू शकता आणि शेअरही करू शकता. हे टूल iOS आणि अॅण्ड्रॉइड युझरसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. इन्स्टाग्रामच्या वतीनं ब्राझीलमध्ये या टूलचे अनावरण करण्यात आले.

वाचा-भारतीय लष्कराचं मोठं फर्मान, 'फेसबुक अकाउंट बंद करा'

रिपोर्टनुसार, या नव्या टूलमुळे 15 सेकंदाचा व्हिडीओ तयार करण्यात येणार आहे. व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर युझर इन्स्टाग्रामवर हे व्हिडीओ तुम्ही स्टोरीजमध्ये शेअर करू शकता. रील्स सेक्शन तुम्हाला एक्सप्लोर टॅबमध्येही दिसू शकतात.

वाचा-FD ऐवजी लोक इथे गुंतवतायत पैसे, तुम्हालाही होईल फायदा

Loading...

वाचा-LIC पॉलिसीधारकांनो सावधान! एका फोन कॉलमुळे होऊ शकतं मोठं नुकसान

इन्स्टाग्रामचे प्रोडक्ट मॅनजमेंट रॉबी स्टीननं हे दोन्ही अप वेगळे असल्याचे सांगितले. तसेच, गाण्यासह युनीवर्स व्हिडीओ तयार करणे ही सर्वांनी वापरलेली .क्ती आहे. त्यामुळं आम्ही रील अपसह वेगळे फिचर आणणार आहे. इन्स्टाग्राममध्येही टीक टॉकप्रमाणे मीडिया लायब्ररी असणार आहे. जेथे गाण्यासह व्हिडीओ ठेवू शकता. त्यामुळं तुम्हाला हवा तसा व्हिडीओ तुम्ही तयार करू शकता”, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2019 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...