नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर : भारतात वाहतूकीची, ट्रॅफिकची मोठी समस्या आहे. घराबाहेर पडल्यावर गाड्यांचे आवाज सतत ऐकायला मिळतात. रस्त्यांवरील या कर्कश आवाजाच्या हॉर्नमुळे वैतागलेल्या लोकांसाठी आता चांगली बातमी आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली. ते एक असा कायदा लागू करण्याची योजना आखत आहेत, ज्याअंतर्गत वाहनांच्या हॉर्नच्या रुपात केवळ भारतीय संगीत, वाद्यांच्या आवाजाचा वापर केला जाऊ शकतो.
त्याशिवाय गडकरी यांनी ते अॅम्बुलन्स आणि पोलिसांच्या गाडीच्या सायरनचंही विश्लेषण करत असल्याचं सांगितलं. हे सायरन ऑल इंडिया रेडिओवर वाजवण्यात येणाऱ्या एखाद्या अतिशय सुखद सुरांसह बदलण्याच्या दिशेने योजना आखत आहेत. लाल बत्ती बंद करण्यात आली आहे. आता हे सायरनही बंद करू इच्छित असून अॅम्बुलन्स आणि पोलिसांद्वारा वापरल्या जाणाऱ्या सायरनचा अभ्यास करत असल्याचंही ते म्हणाले.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितलं, की एका कलाकाराने आकाशवाणीवर एका सुराची रचना केली आणि ती सकाळी सकाळी वाजवली. मी तो सूर, ती ट्यून अॅम्बुलन्ससाठी वापरण्याचा विचार करत आहे, जेणेकरुन लोकांना चांगलं, प्रसन्न वाटेल. कारण सध्याचा सायरन त्रासदायक वाटत असून त्यामुळे कानाला नुकसानही होतं.
'मी यावर अभ्यास करत आहे आणि लवकरच याबाबत योजना बनवण्याचा विचार करत आहे. सर्व वाहनांचे हॉर्न बासरी, तबला, हार्मोनियम, वायलिन यांसारख्या भारतीय वाद्यांमध्ये असावेत, जेणेकरुन ते ऐकायला सुखत वाटतील.', नाशिकमधील एका महामार्ग उद्धाटनाच्या समारंभात ते बोलत होते.
दरम्याम, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारखी शहरं देशातील सर्वात ध्वनी प्रदूषण करणारी शहरं आहेत. रहिवासी भागातील आवाजाचा स्तर दिवसा 55dB आणि रात्री 45dB हून अधिक नसावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Traffic Rules, Vehicles