Home /News /auto-and-tech /

आजपासून महागली 'या' प्रसिद्ध कंपनीची वाहनं; मॉडेलनुसार मोजावे लागणार अधिक पैसे

आजपासून महागली 'या' प्रसिद्ध कंपनीची वाहनं; मॉडेलनुसार मोजावे लागणार अधिक पैसे

आजपासून महागली या प्रसिद्ध कंपनीची वाहनं; मॉडेलनुसार मोजावे लागणार अधिक पैसे

आजपासून महागली या प्रसिद्ध कंपनीची वाहनं; मॉडेलनुसार मोजावे लागणार अधिक पैसे

Increase in Price of Tata Motors Commercial Vehicle: आजपासून जुलै महिना सुरु झाला आहे. नवीन महिना सुरू होताच तुमच्यासाठी एक वाईट बातमीही आली आहे. वास्तविक, आजपासून टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन (Commercial Vehicle- CV) घेणे महाग झाले आहे. कंपनीने या वाहनांच्या किमतीत 1.5-2.5 टक्के वाढ केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 1 जुलै : आजपासून जुलै महिना सुरु झाला आहे. नवीन महिना सुरू होताच तुमच्यासाठी एक वाईट बातमीही आली आहे. वास्तविक, आजपासून टाटा मोटर्सचे व्यावसायिक वाहन (Commercial Vehicle- CV) घेणे महाग झाले आहे. कंपनीने या वाहनांच्या किमतीत 1.5-2.5 टक्के वाढ केली आहे. सर्व व्यावसायिक वाहनांवरील नवीन किमती आज रात्री १२ वाजल्यापासून लागू झाल्या आहेत. वाहनांच्या वाढत्या इनपुट कॉस्टमुळे कंपनीने किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी टाटा मोटर्सने (Tata Motors) वर्षाच्या सुरुवातीलाच किमती वाढवल्या होत्या. मॉडेलनुसार किंमतीत वाढ- टाटा व्यावसायिक वाहनांच्या किमती किती वाढतील हे मॉडेल आणि प्रकारानुसार बदलू शकते. तथापि, किमान 1.5 टक्के आणि कमाल 2.5 टक्के वाढ होणार हे निश्चित आहे. कंपनीचे म्हटलं आहे की उत्पादनादरम्यान वेगवेगळ्या उत्पादनांच्या वाढीव खर्चाचा भार ती सहन करू शकत नाही. अशा स्थितीत आता ग्राहकांवर थोडा बोजा टाकणे गरजेचे झाले आहे. टाटाने एप्रिलमध्ये प्रवासी वाहनांच्या सेगमेंटमध्ये 1.1 टक्के वाढ केली होती. हेही वाचा- पाण्यात जाताच कारची बनली बोट; VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का व्यावसायिक वाहनांची विक्री वाढली- Tata Motors ची भारतातील व्यावसायिक वाहनांची विक्री वाढून 31,414 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी या काळात विक्री 9,371 युनिट्सवर पोहोचली होती. कंपनीची गतवर्षी म्हणजेच कोविडदरम्यान मे 2021 मधील एकूण विक्री 26,661 च्या तुलनेत जवळपास तिपटीने वाढून 76,210 युनिट्स पर्यंत पोहोचली. युटिलिटी वाहने, पिक-अप, ट्रक आणि बसेस इत्यादी उत्पादने असलेली ही कंपनी मोठी जागतिक ऑटोमोबाईल कंपनी आहे. हेही वाचा- आता फक्त 19 रुपयांमध्ये ऍक्टिव्ह राहणार सिम, या कंपनीचा नवा प्लान लॉन्च EV विभागातील टाटा सर्वात मोठी कंपनी- टाटा मोटर्स इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. या विभागात कंपनीचा 80 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा आहे. गेल्या महिन्यात, कंपनीने आपला पहिला इलेक्ट्रिक ट्रक Tata Ace EV देखील सादर केला. टाटा मोटर्सचा व्यवसाय भारत, यूके, दक्षिण कोरिया, थायलंड, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, दक्षिण आणि आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका, रशिया आणि इतर देशांमध्ये पसरलेला आहे.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Tata group, Vehicles

    पुढील बातम्या