मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /टोलनाक्यावर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ थांबाव लागल्यास तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या NHAIच्या नव्या गाइडलाइन्स

टोलनाक्यावर 10 सेकंदांपेक्षा अधिक वेळ थांबाव लागल्यास तुम्हाला टोलमाफ; जाणून घ्या NHAIच्या नव्या गाइडलाइन्स

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल प्लाझामध्ये वाहनांनी प्रवेश करण्यापूर्वी 100 मीटर अंतर अलिकडे टोल प्लाझा यंत्रणेने यलो लाईन आखावी, असे सांगितले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल प्लाझामध्ये वाहनांनी प्रवेश करण्यापूर्वी 100 मीटर अंतर अलिकडे टोल प्लाझा यंत्रणेने यलो लाईन आखावी, असे सांगितले आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल प्लाझामध्ये वाहनांनी प्रवेश करण्यापूर्वी 100 मीटर अंतर अलिकडे टोल प्लाझा यंत्रणेने यलो लाईन आखावी, असे सांगितले आहे.

  नवी दिल्ली, 28 मे: टोल प्लाझावर (Toll Plaza) टोल भरणे हे अनेकदा वाहन चालकांसाठी जिकीरीचे ठरते. वाहनांच्या लांबच लांब रांगा, त्यामुळे लागणारा वेळ, टोल कर्मचाऱ्यांची वर्तणूक आदी कारणांनी टोल प्लाझा अनेकदा चर्चेत असतात. त्यावर फास्टॅग (Fastag) ही प्रणाली लागू करण्यात आलेली असली तरी रोखीने टोल भरणाऱ्या वाहनचालकांचे प्रमाणही अजून लक्षणीय आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नुकत्याच नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या अंतर्गत टोल ऑपरेटरला (Toll Operator) प्रत्येक वाहनासाठीचा सेवा कालावधी 10 सेकंदापेक्षा जास्त नसावा, याची काळजी घ्यावी लागणार आहे. टोल नाक्यावर एखाद्या फोर व्हिलरला 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबावे लागल्यास त्यास कर भरण्यापासून सूट मिळणार आहे. वाहन चालकांना टोल प्लाझावर पुरेसा जागा उपलब्ध व्हावी यासाठी पिक अवर्स (Peak Hours) दरम्यान देखील हा नियम लागू असेल.

  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टोल प्लाझामध्ये वाहनांनी प्रवेश करण्यापूर्वी 100 मीटर अंतर अलिकडे टोल प्लाझा यंत्रणेने यलो लाईन (Yellow Line) आखावी, असे सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत यलो लाईन म्हणजेच पिवळी रेषेच्या मागे वाहने दिसली तर टोल ऑपरेटरला कर न घेता गाड्या पुढे सोडाव्या लागतील. राष्ट्रीय महामार्गांवर गर्दीच्या काळातही टोल प्लाझावर टोल भरताना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून हा नवीन नियम लागू करण्यात आल्याचे एनएचएआयने सांगितल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

  Tyres साठीचा नवा नियम, येत्या ऑक्टोबरपासून होणार लागू; पाहा तुम्हाला काय आणि कसा होणार फायदा

  महामारीच्या (Pandemic) पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) सारखे नवीन नियम आणि त्यामुळे संपर्करहित पेमेंटला आलेले महत्व पाहता अधिकाधिक वाहनचालक फास्टॅग अंतर्गत कसे येतील हे विचारात घेणे गरजेचे आहे. एनएचएआयच्या म्हणण्यानुसार फास्टॅग प्रणालीमुळे टोल प्लाझावरील वाहनांची टोल भरण्यासाठीची प्रतिक्षा करण्याचा वेळ कमी झाला आहे. नवीन नियमानुसार, 100 मीटरपेक्षा अधिक अंतरावर प्रमाणापेक्षा अधिक वाहनांची रांग लागल्यास वाहनांना टोल न भरता पुढे जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

  तथापि, हा नवीन नियम फक्त रोख रक्कम देत टोल भरणाऱ्यांसाठी असेल. जे वाहन चालक टोल भरण्यासाठी फास्टॅग प्रणालीचा वापर करतात, त्यांचे वाहन टोल खिडकी जवळ येताच टोलची रक्कम आपोआपच वजा होते. त्यामुळे फास्टॅग प्रणाली वापरणाऱ्या वाहन चालकास 10 सेकंदांपेक्षा जास्त काळ टोल प्लाझावर थांबावे लागले तर त्यास टोल मधून सूट मिळणार का हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. तसेच प्रत्येक टोल प्लाझावर फास्टॅग प्रणालीव्दारे टोल भरणाऱ्या वाहन चालकांसाठी स्वतंत्र लेन असते. त्यामुळे हे कामकाज जे वाहनचालक रोख टोल भरतात त्यांच्या तुलनेत वेगवान आणि सहजपणे चालते.

  First published:

  Tags: India, Toll plaza