Google Account लॉक झालं तर काय कराल? हा आहे पर्याय

Google Account लॉक झालं तर काय कराल? हा आहे पर्याय

वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन अकाउंट्स (Online Accounts) हाताळण्याशिवाय सध्याच्या काळात पर्यायच राहिलेला नाही. त्याचे पासवर्ड लक्षात ठेवणं ही त्यापुढची महत्त्वाची आणि कठीण गोष्ट. आणि सगळी काळजी घेऊनही अकाउंट लॉक (Account Lock)होण्याचा अनुभव अनेकांना येतो.

  • Share this:

मुंबई, 5 मे : वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन अकाउंट्स (Online Accounts) हाताळण्याशिवाय सध्याच्या काळात पर्यायच राहिलेला नाही. त्याचे पासवर्ड लक्षात ठेवणं ही त्यापुढची महत्त्वाची आणि कठीण गोष्ट. आणि सगळी काळजी घेऊनही अकाउंट लॉक (Account Lock)होण्याचा अनुभव अनेकांना येतो. हा अनुभव खूपच त्रासदायक असतो. कारण आपल्या अकाउंट सिक्युरिटीसाठी (Account Security) केलेल्या सगळ्या उपाययोजना आपल्यालाही अकाउंटमध्ये जाऊ देत नाहीतअसं काही वेळा घडतं. गुगल अकाऊंटमध्ये (Google Account) ई-मेल्सकाँटॅक्ट्सनोट्सचॅट अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी असतात. त्यामुळे गुगल अकाऊंटच्या बाबतीत असं काही झालं तर खूपच अवघड परिस्थिती निर्माण होते.

गुगलच्या पर्सनल ई-मेल अकाऊंटच्याबाबतीत असं काही झालंतर गुगल सपोर्ट टीमकडूनही फार काही मदत होऊ शकत नाही. कारण सिक्युरिटीसाठी अत्यंत कठोर निकष दिलेले असल्याने त्याद्वारे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याशिवाय गुगल टीम काहीही मदत करू शकत नाही. गेमडेव्हलपर माइक रोझ याला नुकताच त्याच्या पर्सनल गुगल अकाउंटच्या बाबतीत असा अनुभव आला. संशयास्पद कृती (Suspicious Activity) असा मेसेज आल्यामुळे तो त्याच्या गुगल अकाउंटमधून बाहेर पडला. त्यानंतर त्याने गुगल वर्क स्पेस सपोर्ट टीमशी (Google Workspace Support Team)संपर्क साधला. अगदीच आशासोडून देण्याआधी त्याने काही प्रयत्नही केले. आणि त्या प्रयत्नांतून त्याचं अकाउंट रिकव्हरही झालं. त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून आपला अनुभव शेअर केला आहे. गुगस वर्क स्पेस सपोर्ट टीममधील डॅनियल यांच्याशी झालेल्या संवादाचा स्क्रीनशॉट त्याने ट्विटरवर शेअर केला आहे.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल जीमेल अकाउंट्ससाठी गुगलकडून लाइव्ह सपोर्ट पुरवला जात नाही. वर्क स्पेस सपोर्टकडून असं सांगण्यात आलंकी गुगल हेल्प फोरमवर याबद्दलचा प्रश्न शेअर करावा आणि त्याचं उत्तर मिळण्याची प्रतीक्षा करावी. फोरमवरून मिळणारं साह्य पटकन मिळत नाही.

गेम डेव्हलपर डॅनियलची दोन पर्सनल अकाउंट्स लॉक झाली होती. फरगॉट पासवर्ड या पर्यायाचाही काही उपयोग झाला नाही. गुगलच्या सपोर्ट टीममधल्या कर्मचाऱ्यांकडे सर्व टूल्स असूनही ते लॉक झालेल्या पर्सनल अकाउंटचा ताबा मिळवू शकत नाहीत. त्यामुळे आपल्यासारख्या युझर्सची काय कथा! नशीबावरच अवलंबून राहावं लागतं. तरीही डॅनियल रोझने काही प्रयत्न करून पाहिले. त्यात त्याला यश आलं.त्याबद्दल त्याने माहिती दिली.

तुमच्या वेब ब्राउझरमध्ये जीमेल लॉगिन पेजवर जावं आणि F12 ही की दाबावी. त्यानंतर ब्राउझर विंडोमध्ये नवा कॉन्सोल ओपन होईल. डॅशबोर्डच्या वरच्या भागातल्या टॅबमधील अॅप्लिकेशन निवडावं. त्यानंतर डाव्या बाजूला साइडबार उघडतो. तिथे कुकीज हा पर्याय निवडावा आणि त्या क्लिअर कराव्यात. त्यानंतर तुम्ही जेव्हा पुन्हा लॉगिनचा प्रयत्न करता,तेव्हा तुमच्यासमोर सिक्युरिटी क्वेश्चन्सचा दुसरा सेट येतो. त्याच्या साह्याने तुम्ही कदाचित यशस्वीपणे लॉगिन करू शकता.

न्यूज18ने डॅशबोर्डवरच्या या मोड्युलचा वापर करून पाहिला,तेव्हा ते गुगल क्रोम या वेब ब्राउझरवर चाललं. सफारी वेब ब्राउझरमध्ये मात्र ते चाललं नाही. त्यामुळे एखाद्या वेब ब्राउझरमध्ये हा पर्याय चालला नाहीतर वेगवेगळ्यावेब ब्राउझर्समध्ये तो ट्राय करून पाहावा लागेल. त्यामुळे तुमचं गुगल अकाऊंट लॉक झालं असेलतर हा एक आशेचा किरण आहे.

First published: May 5, 2021, 10:48 PM IST
Tags: Google

ताज्या बातम्या