मुंबई, 26 नोव्हेंबर: सीएनजी किंवा कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसचा वापर व्हेईकल फ्यूल म्हणून केला जातो. सीएनजी पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा अधिक किफायतशीर आहे. पेट्रोल आणि डिझेलपेक्षा ते पर्यावरणासाठीही चांगलं आहे. त्यामुळं प्रदूषण कमी होतं. अशा परिस्थितीत सरकारही त्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देत आहे. याशिवाय अशा काही टिप्स आणि युक्त्या आहेत, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमचं इंधन आणि पैसे वाचवू शकता.
सीएनजी टाकी ओव्हरफिल करू नका-
तुमच्या वाहनाची CNG टाकी पूर्ण भरू नका किंवा ओव्हरफिल करू नका. कारण यामुळं जास्तीचा गॅस बाहेर पडेल आणि त्यामुळं या इंधनाचा अपव्यय होईल. पेट्रोल किंवा डिझेल वाहनांमध्ये फ्लूल ओव्हरफिल करू नये, असं सांगितलं जातं, त्याचप्रमाणे सीएनजी टाकी जास्त भरू नये.
एसी किंवा हिटरचा जास्त वापर करू नका-
पेट्रोल किंवा डिझेल कारप्रमाणे सीएनजी कारमध्ये एसी किंवा हीटर वापरल्यानं तुमच्या इंधनाच्या वापरावरही परिणाम होऊ शकतो. लक्षात ठेवा की एसी किंवा हिटर कमीत कमी पातळीवर सुरु ठेवावेत. कारण एसी किंवा हीटर भरपूर ऊर्जा वापरतो. एसी किंवा हीटर चालू ठेवल्यास सीएनजी कारचा इंधनाचा वापर लक्षणीय वाढतो. याचा कार वाहन मालकाला तोटा सहन करावा लागू शकतो.
हेही वाचा: बाबो! इथे कार पार्किंगसाठी मोजावे लागतात 2.45 कोटी रुपये, पाहा खास पार्किंगचा झक्कास Video
टायर प्रेशर कंट्रोल राखणं-
कार कोणत्याही इंधनावर चालणारी कार असो, टायरमधील हवेचं प्रेशर खूप महत्त्वाचं असतं. टायरमध्ये हवेचा दाब कमी झाल्यास पॉवरट्रेनवर दबाव वाढतो. त्यामुळे तेलाचा वापर वाढतो. त्यामुळे टायर प्रेशर नेहमी योग्य पातळीवर ठेवावा.
गॅस गळतीची काळजी घ्या-
तुमच्याकडेही सीएनजी कार असेल तर इंधन टाकीतून गॅस बाहेर लीक तर होत नाही ना? याकडे लक्ष द्या. गॅस टँक व्यवस्थित बंद असल्याची खात्री करावी. याशिवाय तुमची कार नेहमी सूर्यप्रकाशापासून दूर कुठेतरी झाडाखाली पार्क करा, कारण तुमच्या कारवर थेट सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम कारवर होतो. गाडी सावलीत पार्क केल्यानं सीएनजी बाहेर येण्याची शक्यता कमी होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car