मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

तुम्हीही Electric vehicle खरेदी करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची!

तुम्हीही Electric vehicle खरेदी करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची!

देशात ईव्ही वाहनांची (electric vehicle) मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे. तुम्हीही असे वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol- Diesel Prize) गगनाला भिडले आहेत. परिणामी लोक मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicles in India) वळताना दिसत आहे. तुम्हीही ई-वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडा अभ्यास करणे फार आवश्यक आहे. वाहने नेहमी आपल्या गरजेनुसारच घ्यावीत. तुमच्या कुटुंबं किती मोठं आहे? तुमचे बजेट, मायलेज सर्व गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अशाच काही गोष्टींची चर्चा आपण या बातमीत करणार आहोत.

वाहन निवडा

कोणतेही वाहन घेण्याचा विचार करताना आपण जे ठरवतो तेच इथंही महत्वाचं आहे. तुम्हाला इलेक्ट्रिक मोपेड घ्यायची की बाईक? किंवा तुम्ही कार घेण्याचा विचार करताय हे नक्की ठरवा. कोणी सांगितलं म्हणून वाहन खरेदी करण्याचा विचार करू नका. तुमची आणि कुटुंबाच्या गरजेनुसारच वाहन खरेदी करा.

कंपनीचे विषयी रिसर्च करा

सध्या इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या अनेक स्टार्टअप कंपन्या सुरू झाल्या आहेत. अनेक कंपन्या स्वस्तात वाहनेही देत ​​आहेत. त्याचबरोबर सवलतीच्या ऑफरही दिल्या जात आहेत, त्यामुळे कोणताही लोभ न ठेवता कंपनीची माहिती गोळा करा, तुम्हाला जे वाहन घ्यायचे आहे त्याबद्दल तज्ञांचे मत घ्या. ज्या कंपनीचे वाहन तुम्हाला खरेदी करायचे आहे त्या कंपनीचे संशोधन करा. यामध्ये तुम्हाला कंपनीकडून विकली जाणारी वाहने किती टिकाऊ आहेत आणि त्यांची कामगिरी कशी आहे हे कळते.

महाराष्ट्रात E-Vehicles वर तब्बल 25 हजारांपर्यंत डिस्काऊंट

गॅरंटी-वॉरंटी पाहुन घ्या

जर तुम्ही नवीन EV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम त्या इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरी लाइफबद्दल संपूर्ण माहिती घ्या. त्याची गॅरंटी-वॉरंटीबाबत खात्री करून घ्या. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर कार किंवा बाईक किती काळ सेवा देईल हे डीलरकडे तपासून घ्या. तसेच बॅटरीचे आयुष्य किती वर्षे आहे याची माहिती घ्या.

तुम्ही खरेदी करत असलेल्या वाहनाचा प्रत्येक पर्याय एक्सप्लोर करा

अनेक कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने बाजारात आली आहेत. या परिस्थितीत आपल्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. वाहन खरेदी करण्यापूर्वी त्या विभागातील सर्व वाहनांचा अभ्यास करावा. इलेक्ट्रिक वाहने घेण्यापूर्वी त्याच्या किमतीचाही अभ्यास करा. याशिवाय, त्या वाहनाची इतर ई-वाहनांशी तुलना करा.

Tata Nexon EV: कार चालवण्याचा सर्वोत्तम अनुभव, खिशाला परवडेल अशा

'भारतात आता EV क्रांती येण्याची अपेक्षा'

सध्या EV ची संख्या कमी असल्याने त्यांच्या किंमती जास्त आहेत. भारतात आता EV क्रांती येण्याची अपेक्षा सगळेच जण व्यक्त करत आहेत. यासाठी 250 स्टार्टअप व्यवसाय EV उपलब्ध आहेत. त्याशिवाय देशातले प्रमुख वाहन निर्माते इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी झाले आहेत, ही सकारात्मक गोष्ट आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर जीएसटी (GST) 5 टक्के आहे आणि लिथियम–आयन बॅटरीच्या किमतीही कमी होऊ लागल्या आहेत, अशी माहिती गडकरींनी दिली.

First published:

Tags: Electric vehicles, Nitin gadkari, Vehicles