नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सर्वाच्च न्यायालयाने मागील काही दिवसांपूर्वी वाहन चालक आणि अपघाताबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात, जर एखादा व्यक्ती सावधपणे गाडी चालवत असेल आणि तरीही अपघातापासून वाचू शकला नाही, तर ही बाब बेजबाबदारपणा मानला जाणार नाही असं म्हटलं होतं. एक महिला आणि तिच्या दोन मुलांच्या याचिकेवर कोर्टाने हा निर्णय दिला होता.
काय आहे प्रकरण -
हे प्रकरण 2011 सालातील कर्नाटकातील आहे. कर्नाटकात ट्रक आणि कारच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी संपूर्ण प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचलं, त्यावेळी उच्च न्यायालयाने ट्रक आणि कार चालक दोघांनाही समान दोषी ठरवलं.
परंतु सर्वाच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं. खबरदारी घेऊनही धडक टाळता आली नाही, म्हणजे हा निष्काळजीपणा ठरू शकत नाही, असं सर्वाच्च न्यायालयाने म्हटलं.
याप्रकरणी सर्वात आधी कर्नाटक उच्च न्यायालयाने दोषी ठरवत जो निर्णय दिला, तो पुराव्यांवर आधारित नाही. उच्च न्यायालयाने केवळ एका गृहितकावर निर्णय दिला, जो न्यायसंगत नाही, असंही सर्वाच्च न्यायालयाने सांगितलं.
सावधपणे गाडी चालवत असतानाही धडक झाल्यास -
कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितलं, की कार चालक ट्रॅफिक नियमांतर्गत सावधपणे कार चालवत असता, तर ही घटना घडली नसती. परंतु उच्च न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत, सर्वाच्च न्यायालयाने सुनावणी वेळी सांगितलं, की असा कोणताही पुरावा किंवा रेकॉर्ड नाही ज्यात कार चालक मध्यम स्पीडमध्ये कार चालवत नव्हता किंवा ट्रॅफिक नियमांचं पालन करत नव्हता, असं आढळलं नाही.
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बदलला -
यावरच काही दिवसांपूर्वी सर्वाच्च न्यायालयाने मृत कार चालकाची पत्नी आणि दोन मुलांचं अपील स्वीकारत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला. त्याशिवाय पीडिताच्या कुटुंबियांना 9 टक्के व्याज दराने 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिले.
2011 साली ही घटना घडली होती. कारची ट्रकला धडक लागली, त्यात कार चालकाचा मृत्यू झाला. कार चालकाच्या पत्नी आणि मुलांनी ट्रक चालकाने अचानक ट्रक थांबवला त्यामुळे कार आणि ट्रकची टक्कर झाल्याचा आरोप केला होता. त्यावर सर्वाच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accident, Truck accident