Home /News /auto-and-tech /

Hyundai लॉन्च करणार नवी कार, Tata Nexonला देणार तगडी स्पर्धा, जाणून घ्या फिचर्स

Hyundai लॉन्च करणार नवी कार, Tata Nexonला देणार तगडी स्पर्धा, जाणून घ्या फिचर्स

Hyundai लॉन्च करणार नवी कार, Tata Nexonला देणार तगडी स्पर्धा, जाणून घ्या फिचर्स

Hyundai लॉन्च करणार नवी कार, Tata Nexonला देणार तगडी स्पर्धा, जाणून घ्या फिचर्स

Hyundai Venue N Line : अलीकडच्या काळात भारतीय कार बाजारामध्ये प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. ह्युंदाईने या महिन्याच्या सुरुवातीच्या किमतीत नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट (Hyundai Venue Facelift) लॉन्च केली होती. आता ह्युंडाई लवकरच वेन्यू सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही (SUV) लाँच करणार आहे. ही कार टाटाची सुप्रसिद्ध कार टाटा नेक्सॉनशी (Tata Nexon) स्पर्धा करेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 जून: अलीकडच्या काळात भारतीय कार बाजारात (Automobile Market) प्रचंड स्पर्धा पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी आपली दमदार वाहनं लाँच केली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या अनेक फिचर्स ऑफर करत आहेत. प्रसिद्ध कार निर्मात कंपनी ह्युंदाई (Hyundai) लवकरच एक नवी कार भारतीय कार बाजारात लाँच करणार आहे. ह्युंदाई वेन्यू सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही (Hyundai Venue N Line) ्रअसं या कारचं नाव असणार आहे. ही कार टाटाची सुप्रसिद्ध कार टाटा नेक्सॉनशी (Tata Nexon) स्पर्धा करेल. ह्युंदाईने या महिन्याच्या सुरुवातीला नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट लॉन्च केली होती. कंपनीने या कारची किंमत 7.53 लाख रुपये (एक्स-शोरूम) जाहीर केली असून ही कार E, S, S(O), SX, SX(O) आणि S+ या सहा ट्रिम पर्यायांसह येते. यासोबतच, फँटम ब्लॅक, पोलर व्हाइट, टायटन ग्रे, डॅमिन ब्लू, टायफून सिल्व्हर आणि फायरी रेड या 7 रंगांच्या पर्यायांमध्ये हे बाजारात सादर करण्यात आली आहे. हेही वाचा- फक्त आणखी एक दिवस अन् भारतात लॉन्च होणार नवीन महिंद्रा Scorpio; सनरूफसह अनेक फिचर्स आता कंपनी लवकरच देशात व्हेन्यू सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीचे एन-लाइन (Hyundai Venue N Line) व्हेरियंट आणणार आहे. ही कार N6 आणि N8 या दोन प्रकारांमध्ये ऑफर केली जात असून तिच्यामध्ये 1.0-लिटर, 3-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे टर्बोचार्ज युनिट 82bhp पीक पॉवर आणि 113.8Nm टॉर्क जनरेट करते. या SUV चे N-Line व्हेरियंट सिंगल 7-स्पीड DCT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह ऑफर केले जाईल. 2022 ह्युंदाई वेन्यू इंटीरियर- SUV मॉडेल लाइनअप 1.2L MPi पेट्रोल आणि 1.5L डिझेल इंजिन पर्यायांसह देखील उपलब्ध केलं जाईल. त्याची मोटर 6,000rpm वर 82bhp टॉप पॉवर आणि 4,000rpm वर 113.8Nm टॉप टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड IMT समाविष्ट आहे. हेही वाचा- Tata ची नवी Car लाँच, केवळ 21000 रुपयांत बुक करता येणार Tata Altroz DCA; पाहा फीचर्स आणि किंमत आगामी Hyundai Venue N लाइन व्हेरियंट त्याच्या स्पोर्टी डिझाइन बिट्समुळे सध्याच्या मॉडेलपेक्षा थोडा वेगळा लूक मिळेल. कंपनीनं याबद्दल अजून कोणताही अधिकृत तपशील उघड केला नाही. परंतु नवीन मॉडेलला समोरच्या फेंडर्सवर एन-लाइन बॅजिंग, नव्यानं डिझाइन केलेले चाके आणि छताच्या रेलवर लाल इन्सर्ट मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या केबिनमध्येही काही बदल दिसतील. नवीन Hyundai Venue N-Line स्पोर्टी ऑल-ब्लॅक इंटीरियर थीम आणि केबिनभोवती 'N' बॅजिंगसह येऊ शकते. तथापि, तिच्या आतील लेआउट आणि वैशिष्ट्यांच्या सूचीमध्ये बदल दिसणार नाहीत. वेन्यू N-Line प्रकाराची किंमत आणि तपशील येत्या काही महिन्यांत उघड होण्याची शक्यता आहे.
    First published:

    Tags: Car

    पुढील बातम्या