आली Hyundai ची Aura, मारूतीच्या Dzire ला देणार टक्कर, का आहे चांगली जाणून घ्या!

आली Hyundai ची Aura, मारूतीच्या Dzire ला देणार टक्कर, का आहे चांगली जाणून घ्या!

हुंदाई (Hyundai) ने अखेर आपल्या कॉम्पॅक्ट सिडान Aura वरून पडदा हटवला आहे. एक्सेंटचा हा नवा अवतार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : हुंदाई (Hyundai) ने अखेर आपल्या कॉम्पॅक्ट सिडान Aura वरून पडदा हटवला आहे. एक्सेंटचा हा नवा अवतार आहे. या कारची बाजारपेठेत मारूती सुझुकीच्या (Dzire) आणि होंडा एमेज (Amaze) शी सामना होणार आहे. कंपनीने Aura ला पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लाँच करणार आहे. सोबतच ही कार बीएस-6 मानकांसह विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

डिझाइन

ज्या प्रकारे हुंदाईची एक्सेंट, ग्रँड आणि आय10 वर तयार झाली होती, तशीच Aura ही सुद्धा Grand i10 Nios वर तयार झाली आहे. असं यासाठी सांगतोय कारण, या कारचा समोरून लूक पाहिला तर सेम Nios सारखा आहे. यामध्ये सेटिन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर टाइप, हेडलॅम्स आणि फॉग लॅम्पससह R15 Diamond Cut अलॉय व्हिलस दिले आहे. कारच्या रिअरमध्ये स्पोर्टी बंपर दिला आहे. तसंच 3D आउटर लेंससोबत LED टेललॅम्प दिले आहे.

इंजिन

या कारमध्ये कंपनीने BS6 सह पेट्रोल आणि डिझेल इंजिन दिले आहे. या कारची चांगली गोष्ट म्हणजे, ही कार कमी व्हायब्रेशन होते आणि चांगल्या परफॉर्मन्ससह जास्त मायलेजही देईल. तसंच हुंदाई AURA देशातील पहिली आपल्या सेग्मेंटमध्ये अशी सिडान कार आहे, ज्यामध्ये BS6 Turbo Charged Petrol Engine दिले आहे.

ऑराचं इंजिन हे 83bhp पॉवर देणारे 1.2-litre BS-VI T-GDI पेट्रोल इंजिन, 100bhp पॉवर देणारे 1.0-litre turbo petrol इंजिन आणि 75hp ताकद देणारे डिझेल इंजिन मिळणार आहे.

इंटेरिअर

हुंदाईने या कारमध्ये 8 इंच इतक्या मोठ्या टचस्क्रीनचा इन्फोटेनमेंट सिस्टम दिला आहे. जो Android Auto आणि Apple CarPlay दोघांनीही सपोर्ट करतो. तसंच यामध्ये Arkamys Premium साऊंड, 5.3 इंचाचा डिजीटल स्पीडोमिटर आणि मल्टी इनफॉर्मेशन डिस्प्लेसह वायरलेस चार्जिंग सारखे फिचर्स दिले आहे.

कुणाशी होणार सामना?

या कारचा सामना थेट Tata Tigor, Honda Amaze, Volkswagen Ameo, Ford Figo Aspire आणि Maruti Suzuki Dzire सारख्या कारसोबत होणार आहे.

किंमत

Aura ची किंमत अजून जाहीर करण्यात आली नाही. परंतु, अशी अपेक्षा केली जात आहे की, एक्स शोरूम किंमत ही 5.8 लाख रूपये ते 8.7 लाखमध्ये असणार आहे. ही कार भारतात पुढील वर्षाच्या सुरुवातील लाँच होईल आणि तेव्हाच या कारची खरी किंमत समोर येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2019 10:18 PM IST

ताज्या बातम्या