मुंबई, 19 फेब्रुवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 19 फेब्रुवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
दैनंदिन आयुष्याचा कंटाळा आला असेल, तर एखादं जुनं पॅशन पुन्हा फॉलो करू शकता. काही दिवसांमध्ये रटाळ दिनचर्येतून सुटका होईल. आठवड्याभरात पैशांचे प्रश्न मार्गी लागतील. एखादा पाळीव प्राणी घरात आणल्यामुळे मानसिक शांती मिळेल. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ व्यतीत केल्याने आनंदी राहाल.
LUCKY SIGN – An open gate
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखादी गोष्ट खटकत असेल, तर त्यावर लवकरात लवकर तोडगा काढा. कोणतंही प्रकरण गरजेपेक्षा अधिक ताणू नका. एखादी वेगळी आणि आकर्षक संधी चालून येईल. त्यावर लगेच निर्णय घेतला नाही तर ती संधी दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकते. चिडचिड होईल. सध्याचा काळ प्रश्न सोडवण्याचा आहे. त्यानुसार वागणं योग्य ठरेल.
LUCKY SIGN – New Crockery
2023च्या पहिल्या सूर्यग्रहणात या 3 राशींवर होणार विपरीत परिणाम, जाणून घ्या राशी
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखाद्या चर्चेमध्ये तुम्ही सर्वांचे बोलणं ऐकून मगच आपलं मत मांडता. तुमचा स्वभावच तसा आहे; मात्र आता तुम्ही एखाद्या गोष्टीत अगदी पहिल्यापासून सहभागी असाल. कामाच्या बाबतीत दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात; मात्र वेळ साथ देत नाहीये. आणखी काही दिवस असेच प्रयत्न करावे लागतील.
LUCKY SIGN – An amethyst
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
पुढचा आठवडा अगदी वेगाचा आणि प्रवासाचा आहे. तुम्ही ज्या गोष्टीवर काम करत आहात ती आता गती घेईल. तुमच्या वेळेशी जुळवून घेणारं नवीन वेळापत्रक बनवणं फायद्याचं ठरेल. मानसिकरीत्या तुम्ही अगदी स्थिर आणि निश्चयी आहात. कुटुंबीयांना मात्र तुमच्यापासून दूर गेल्याची जाणीव होईल; मात्र तुम्ही त्यांना वेळ देऊन हा गैरसमज दूर कराल. घरामध्ये पाळीव प्राणी आणण्याबद्दल विचार करू शकता. बिझनेस मालकांसाठी उत्तर दिशा भाग्याची ठरू शकते.
LUCKY SIGN – A Sparkling Painting
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
एखादी नवीन गोष्ट जी आधी असाध्य वाटत होती, ती आता आवाक्यात दिसेल. तुम्ही ती गोष्ट इतरांना आत्मविश्वासाने सांगू शकाल. ऑफिसमधली एखादी सहकारी व्यक्ती तुमच्या आयुष्याचा भाग होईल आणि तुमच्यातले बंध अधिक मजबूत होतील. भूतकाळात तुमच्या मनात स्वतःबद्दल न्यूनगंड वाटत होता; मात्र आता त्यातून बाहेर पडाल. कोणत्याही प्रकारचं व्यसन नुकसानदायी ठरू शकतं. ते सोडण्याचा प्रयत्न करा.
LUCKY SIGN – An indoor plant
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
गेले काही महिने फक्त दिवास्वप्नं पाहण्यात गेले आहेत. आता मात्र खरोखर उठून काम करण्याची गरज आहे. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी काही सल्ले मिळतील. कमी वेळेत अधिक पैसे कमावण्याची संधी यातून उपलब्ध होऊ शकते. मित्र आणि काम या गोष्टींना किती वेळ द्यायचा याचं नियोजन करण्याची गरज आहे. तुमचा निर्णय तुमच्या पुढच्या काही महिन्यांवर परिणाम करील. कामासाठी प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे. या प्रवासाचा फायदाच होईल.
LUCKY SIGN – An old favorite watch
या 5 चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी, म्हणून या वास्तू फॉलो करून मिळवा समाधान
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
वर्क हार्ड या जुन्या सल्ल्याऐवजी वर्क स्मार्ट हा नवीन सल्ला वापरणं अधिक फायद्याचं ठरेल. स्वतःसाठी काही नवीन नियम लागू करा. येत्या काही दिवसांमध्ये फार विशेष गोष्टी घडणार नाहीत. काही काळ अगदीच रटाळ आणि दिशाहीन वाटेल; मात्र हे अगदी थोडे दिवसच असेल. जुन्या गोष्टी नवीन पद्धतीने करत स्वतःला व्यग्र ठेवा.
LUCKY SIGN – A copper tumbler
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
हा काळ तुमच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारा आहे. ज्या गोष्टी ठरवाल त्या साध्य कराल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. एकमेकांप्रति आदर वाढेल. आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सध्याचा काळ योग्य आहे. प्रवास करताना तुमच्या वस्तूंची काळजी घ्या. भूतकाळातल्या काही घटना पुन्हा घडताना दिसतील.
LUCKY SIGN – A cracked glass
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्ही बऱ्याच गोष्टी एकाच वेळी हाताळण्याचा प्रयत्न करत आहात. कामाला वेळ देण्याच्या प्रयत्नात तुमचं कुटुंबीयांकडे दुर्लक्ष होत आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठांसोबत स्पष्ट संवाद साधा. कोणतीही गोष्ट गृहीत धरू नका. तुमचे वरिष्ठ तुमच्या टीममधल्या व्यक्तींशी संपर्कात असू शकतात. नवीन पार्टनरशिप सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आत्ता योग्य वेळ आहे. स्वतःसाठी वेळ काढा.
LUCKY SIGN – A Crow
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
कोणत्याही प्रकारचं कर्ज सध्या त्रासदायक ठरेल. पैशांचं योग्य नियोजन होण्यासाठी थोडा वेळ लागेल. या वर्षी नवीन वाहन खरेदी करू शकता. अपग्रेड होण्याची गरज जाणवेल. रखडलेलं पेपरवर्क पूर्ण करण्याची गरज आहे. तुमचा स्क्रीन टाइम कमी करणं आवश्यक आहे. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
LUCKY SIGN – A new curtain
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना आनंदी ठेवण्याची कला शिकून घ्या. तुमच्या ओळखीतल्या काही व्यक्ती तुम्ही संपर्क साधण्याची वाट पाहत आहेत. नवीन दिनचर्या सुरू करण्यासाठी चांगली वेळ आहे. आध्यात्मिक रुटीन बसवणं शक्य होईल. एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी त्याचा पाया चांगला असेल याची खात्री करा. काही प्रभावी व्यक्तींची भेट होण्याची शक्यता आहे. बाहेर खाण्याऐवजी घरीच स्वयंपाक करण्याची इच्छा होईल.
LUCKY SIGN – A Doorbell
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
सध्या मानसिकदृष्ट्या समाधानी काळ आहे. ऑनलाइन व्यतीत करत असलेल्या वेळेत वाढ दिसून येईल. शारीरिक हालचाली कमी होतील. लहान मुलांशी अधिक संवाद साधून, त्यांना भरपूर वेळ देण्याची गरज आहे. एखाद्या जुन्या मित्रासोबत काही प्लॅन बनेल, लहानपणीच्या आठवणीत रमून जाल. एखादं स्वप्न तुमच्या मनात घर करून बसेल; मात्र ते अधिक गांभीर्याने घेण्याची गरज नाही. स्वतःला अधिक वेळ द्याल.
LUCKY SIGN – Yellow leaves
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion