Home /News /auto-and-tech /

अपघातापासून वाचवेल Google Maps, स्पीड लिमिड क्रॉस करताच मिळेल सूचना, असं करा सुरु

अपघातापासून वाचवेल Google Maps, स्पीड लिमिड क्रॉस करताच मिळेल सूचना, असं करा सुरु

अपघातापासून वाचवेल Google Maps, स्पीड लिमिड क्रॉस करताच मिळेल सूचना, असं करा सुरु

अपघातापासून वाचवेल Google Maps, स्पीड लिमिड क्रॉस करताच मिळेल सूचना, असं करा सुरु

Google Maps Speedometer: गुगल मॅप्समध्ये स्पीडोमीटर वैशिष्ट्य उपलब्ध आहे. जेव्हा तुम्ही वेगानं गाडी चालवत असता तेव्हा हे वैशिष्ट्य तुम्हाला सूचना देतं.

  मुंबई, 31 जुलै :  अलीकडच्या काळात एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता शोधायला ठिकठिकाणी गाडी थांबवून कुणाला विचारावा लागत नाही. कारण गुगल मॅपच्या (Google Maps) रुपात आपल्याला वाट्याड्या मिळालाय, असं म्हणायला हरकत नाही. गुगल मॅप्सच्या माध्यमातून आपलं दैनंदिन जीवन सुलभ झालं आहे. गुगल मॅप्स आपल्याला फक्त रस्त्यांची माहिती देतं असं नाही, तर रस्त्यांनजीक असणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप इत्यादींचीही माहिती मिळते. गुगल मॅप्समध्ये इतरही काही वैशिष्ट्ये असतात, यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे  स्पीडोमीटर (Speedometer feature in Google Map). स्पीडोमीटरचा पर्याय वापरकर्त्यांनी गाडी चालवताना वेग मर्यादा ओलांडल्यास त्यांना चेतावणी देतो. जर तुमच्या नेव्हिगेशन सिस्टीममध्ये स्पीडोमीटर इनेबल असेल, तर ते तुम्हाला मॅपमध्ये वेगाची माहिती देते. जर तुम्ही वेग मर्यादा ओलांडली तर त्याचा रंग बदलू लागतो. जर तुमच्या भागात स्पीड लिमिट फिचर उपलब्ध असेल, तर तुम्ही वेगानं गाडी चालवल्यास अॅपमधील स्पीडोमीटर तुम्हाला अलर्ट करेल. हे वैशिष्ट्य Google मॅपमध्ये डिफॉल्ट सेटिंगनुसार सुरु केलेलं नसतं. ते तुम्हाला कार्यान्वित करावं लागतं. मात्र अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला गुगल मॅप्समध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग फिचर कसं चालू करायचं ते सांगणार आहोत. हेही वाचा- Top Upcoming Cars in August 2022: Maruti Alto ते Mahindra, 'या' कार पुढील महिन्यात होणार लॉन्च, वाचा डिटेल्स गुगल मॅप्समध्ये स्पीड लिमिट वॉर्निंग फिचर कसं चालू करायचं? (How to start Speedometer feature in Google Map?)- 
  • सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर Google Maps उघडावं लागेल.
  • यानंतर तुम्हाला स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला गुगल अकाउंट प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला Settings या पर्यायावर जावं लागेल.
  • त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि नेव्हिगेशन सेटिंग्जवर या.
  • या स्क्रोलिंगनंतर ड्रायव्हिंग ऑप्शन्स टॅबवर यावं लागेल.
  • येथून तुम्हाला स्पीडोमीटर टॉगल ऑन/ऑफ टॉगल करावं लागेल.
  टीप- गुगल मॅप स्पीडोमीटर केवळ मूलभूत माहितीसाठी आहे. वास्तविक ड्रायव्हिंग गतीची पुष्टी करण्यासाठी तुमच्या कारचे स्पीडोमीटर तपासा. कधीकधी Google Maps मधील स्पीडोमीटर इतर अनेक कारणांमुळे वास्तविक वेगाशी मॅच होत नाही.
  Published by:Suraj Sakunde
  First published:

  Tags: Car, Google, Technology

  पुढील बातम्या