मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Honda Diesel Cars: सणासुदीच्या तोंडावर प्रसिद्ध कार कंपनीचा ग्राहकांना धक्का, कधीच खरेदी करता येणार नाहीत 'या' कार

Honda Diesel Cars: सणासुदीच्या तोंडावर प्रसिद्ध कार कंपनीचा ग्राहकांना धक्का, कधीच खरेदी करता येणार नाहीत 'या' कार

सणासुदीच्या तोंडावर प्रसिद्ध कार कंपनीचा ग्राहकांना धक्का, कधीच खरेदी करता येणार नाहीत 'या' कार

सणासुदीच्या तोंडावर प्रसिद्ध कार कंपनीचा ग्राहकांना धक्का, कधीच खरेदी करता येणार नाहीत 'या' कार

Honda Diesel Cars in India: भारतातील बहुतांश कार निर्माते डिझेल कार बंद करत आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध कार कंपनी होंडाचे नावही जोडले जाणार आहे.

  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 21 सप्टेंबर: भारतातील बहुतांश कार निर्माते डिझेल कार बंद करत आहेत. यामध्ये जगप्रसिद्ध कार कंपनी होंडाचे नावही जोडले जाणार आहे. अलीकडेच होंडानं असे संकेत दिले आहेत की ते आता लवकरच डिझेल कार बंद करू शकतात. होंडानं 2013 मध्ये अमेझ सब-कॉम्पॅक्ट सेडानसह डिझेल कार विभागात प्रवेश केला. सध्या कंपनीच्या पाचव्या पिढीतील होंडा सिटी, अमेझ आणि डब्ल्यूआर-व्ही सारख्या कारच्या काही मॉडेल्समध्ये डिझेल इंजिन दिसत आहे. अलीकडेच होंडा कार्स इंडियाचे सीईओ ताकुया त्सुमुरा यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, “आम्ही आता डिझेल कारबद्दल फारसा विचार करत नाही. त्यामुळे आम्ही डिझेल कार बनवणार नाही. सध्या रिअल ड्रायव्हिंग एमिशन (आरडीई) नियमांमुळं हे अवघड झालं आहे. जेव्हा हे नियम युरोपमध्ये आलं तेव्हा बहुतेक ब्रँड डिझेल कार चालू ठेवू शकले नाहीत. असंच काहीसं भारतात घडत आहे.  पुढील वर्षापासून नवीन नियम लागू होतील: RDE मानक पुढील वर्षापासून देशात लागू होणार आहे. हा नियम लागू केल्यानंतर, CAFE-2 म्हणजेच कॉर्पोरेट एव्हरेज फ्यूल इकॉनमी 2 स्टँडर्ड लागू होतील. नवीन नियम लागू झाल्यानंतर, डिझेल कारसाठी उत्सर्जन मानकांची पूर्तता करणं आवश्यक असेल. सध्या होंडा देशात एकूण चार वाहनं विकते. यामध्ये सबकॉम्पॅक्ट SUV WR-V, प्रीमियम हॅचबॅक जॅझ, मध्यम आकाराच्या सेडान सिटी आणि कॉम्पॅक्ट सेडान अमेझचा समावेश आहे. हेही वाचा: फिजिकल सिमकार्डला करा बाय-बाय! असं मिळवा e-SIM कार्ड, वाचा फायदे हायब्रीड आणि इलेक्ट्रिक कारवर भर दिला जाईल: आगामी काळात इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कारवर भर देणार असल्याचं विधान होंडानं यापूर्वी केलं होतं. कंपनीनं या वर्षाच्या सुरुवातीला होंडा सिटीचे हायब्रीड मॉडेलही लाँच केलं होतं. ही कार सेगमेंटमध्ये सर्वाधिक 26.50 kmpl चा मायलेज देते. कंपनी भारतातील व्यवसाय बंद करणार नाही: दुसरीकडे होंडानं भारतातील व्यवसाय बंद करण्याचे वृत्त फेटाळून लावलं आहे. भारतातील व्यवसाय बंद करण्याचा कंपनीचा कोणताही विचार नसल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. येत्या काही दिवसांत ही मुदत वाढू शकते.
First published:

Tags: Car

पुढील बातम्या