येत आहे नव्या अवतारात Honda लिवो, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

येत आहे नव्या अवतारात Honda लिवो, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

विशेष म्हणजे, या बाइकमध्ये किल स्विच इंजिन दिले आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जून :  Honda मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने 110 CC सेगमेंटमध्ये लिवोचे अपडेटेड व्हर्जन लाँच केली जाणार आहे.   2020 होंडा लिवो 110 BS6 या मानकांसह नव्याने लाँच करण्यात येणार आहे.

लिवो 2020 ही बाईक जुलै महिन्यात लाँच करण्यात येणार आहे.  BS6 होंडा सीडी 110 ड्रीमनंतर लिवो ही 110 सेगमेंटमध्ये ही दुसरी बाइक असणार आहे. कंपनीने अलीकडे भारतीय बाजारपेठेत BS6 सह होंडा ग्राज़िया 125 स्कूटर लाँच केली आहे.

होंडाने या बाइकचा  नवीन टिझर लाँच केला आहे. यामध्ये बाइकमध्ये नवी हॅलोजन हेडलॅम्प, नव्याने आकर्षक डिझाइनसह फ्युल टँक आणि नवीन सेमी-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल दिले आहे. विशेष म्हणजे, या बाइकमध्ये किल स्विच इंजिन दिले आहे. यात इंटीग्रेटेड एसीजी सायलेंट-स्टार्ट फीचर दिले आहे.

आधीच्या लिवो मॉडेलमध्ये 109 cc चे इंजिन होते आणि एअर कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले होते. पण आता या नव्या सुधारीत मॉडेलमध्ये फ्युल-इंजेक्शन आणि एग्ज़्हॉस्ट सिस्टम दिली आहे.

होंडाची Grazia नव्या रुपात ; 6 वर्षांची वॉरंटी आणि 3 वर्ष फ्री सर्व्हिसिंग

लिवोच्या इंजिनमध्ये  8bhp पावरवर 9 nm टॉर्क जनरेट करतो. कंपनीने या बाइकमध्ये 4-स्पीड गियरबॉक्स दिला आहे.

कंपनीने या बाइकमध्ये कॉम्बो ब्रेकिंग सिस्टम दिली आहे.  BS4 मॉडेल लिवोची किंमत नवी दिल्लीत एक्स शोरूम किंमत 58,775 रुपये आहे आणि  BS6 च्या नव्या व्हेरियंटमध्ये  किंमत 10,000 आणि 12,000 जास्त असण्याची शक्यता आहे. या बाइकचा सामना थेट हीरो स्प्लेंडर आईस्मार्ट, टीवीएस विक्टर आणि बजाज प्लॅटिना 110 सोबत होणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: June 25, 2020, 4:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या