अशी आहे नवी Honda City, जाणून घ्या मायलेज आणि फिचर्स

अशी आहे नवी Honda City, जाणून घ्या मायलेज आणि फिचर्स

  • Share this:

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : ऑटो क्षेत्रातील दादा कंपनी असलेली हुंदाई आपली नवी व्हेरना आॅटो एक्स्पो 2020 लाँच करणार आहे. तर दुसरीकडे होंडा सुद्धा आपलं सर्वात लोकप्रिय मॉडेल Honda City चं नवं मॉडेल लाँच करणार आहे. पाचवी जनरेशन  होंडा सिटी थायलँडमध्ये लाँच केली होती. आता भारतात हीच होंडा लाँच करणार आहे. लाँच करण्याआधी या गाडीचे फोटो लिक झाले आहे.

नवी होंडा सिटी ही पहिल्या गाडीपेक्षा100mm जास्त मोठी आहे. त्यामुळे ही गाडी  कॉम्पॅक्ट सिडान ऐवजी मिड-साइज सिडान कार म्हणून ओळखली जाणार आहे. सोबतच ही कार पहिल्या मॉडेलपेक्षा 53mm जास्त रूंद आहे आणि 28mm कमी उंचीची आहे. विशेष म्हणजे, या कारची साईज जरी वाढली असली तरी सुद्धा व्हिलबेस सध्याच्या मॉडेलपेक्षा11mm लहान आहे.

कशी दिसते नवी होंडा सिटी

कारच्या स्टाइलिंगचा विचार केला तर ही नव्या रूपात आली आहे. या कारचा फ्रंट ग्रिल हा  नव्या सिविक कारशी मिळता जुळता आहे. कारचे हेडलॅम्प शार्प आणि यामध्ये एलईडी  प्रोजेक्टरसह डेटाइम रनिंग लॅम्प्स दिले आहे. तसंच बंपर्स नव्या अंदाजात पाहण्यास मिळणार आहे. रियरमध्ये मर्जिंग टेल लॅम्प्स दिले आहे. सिटीमध्ये एलईडी टेल लॅम्प्स, सिम्पल बूट आणि बंपरचे नवे डिझाईन आहे.

कारचं इंटिरिअरमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहे. डॅशबोर्ड नवीन मिळणार आहे.  कारमध्ये ऑल-ब्लॅक इंटिरिअर दिलं आहे. तसंच 8 इंची टचस्क्रीन दिली आहे.

पॉवरफुल टर्बो इंजन

नव्या सिटी 23.8kpl चं मायलेज मिळणार आहे. तसंच यामध्ये 1.0-Litre Turbo Petrol इंजिन  आहे, जे 122hp ची पॉवर आणि 173Nm चा टॉर्क जनरेट करतो. तसं बघायला गेलं तर भारतमध्ये जी कार लाँच होणार आहे

त्यामध्ये 1.5-litre पेट्रोल इंजिन दिले जाण्याची शक्यता आहे.  होंडा  कॉम्पक्ट i-MMD mild-hybrid tech वर आधारीत असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2019 07:47 AM IST

ताज्या बातम्या