मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Honda Cars वर बंपर ऑफर्स, केवळ 31 जानेवारीपर्यंत स्वस्तात कार खरेदीची संधी

Honda Cars वर बंपर ऑफर्स, केवळ 31 जानेवारीपर्यंत स्वस्तात कार खरेदीची संधी

नवी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Honda Cars India ने जानेवारी 2022 साठी आपल्या संपूर्ण सीरिजवर ऑफर्सची घोषणा केली आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 8 जानेवारी : एकीकडे नव्या वर्षात अनेक कार कंपन्यांनी आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या आहेत. तर दुसरीकडे Honda ने आपल्या ग्राहकांसाठी काही ऑफर्स जारी केल्या आहेत. नवी कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी Honda Cars India ने जानेवारी 2022 साठी आपल्या संपूर्ण सीरिजवर ऑफर्सची घोषणा केली आहे. कार निर्माता कंपनी Jazz हॅचबॅकपासून आपल्या संपूर्ण Honda City मिड-साइज सेडान लाइनअपवर 35,596 रुपयांपर्यंत आकर्षित ऑफर्स देत आहे.

या ऑफरमध्ये रोख सूट, FOC अ‍ॅक्सेसरीज, कॉर्पोरेट सूट आणि कार एक्सचेंज सूट सामिल आहे. होंडा ग्राहकांसाठी एक्स्ट्रा बेनिफिट लॉयल्टी बोनस आणि होंडा कार एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. या ऑफर्स 31 जानेवारी 2022 पर्यंत लागू असणार आहेत.

Honda Amaze फेसलिफ्ट 15000 रुपयांपर्यंतच्या बेनिफिट्ससह विक्रीसाठी उपलब्ध आहे. यात 5000 रुपये लॉयल्टी बोनस, 6000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे.

Car साठी का आवश्यक असते NOC, No Objection Certificate साठी घरबसल्या करा अप्लाय

Honda WR-V अधिकृत वेबसाइटवर 26000 रुपयांपर्यंतच्या बेनिफिट्ससह लिस्ट करण्यात आली आहे. यात 10000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट, 5000 रुपयांचा लॉयल्टी बोनस, 7000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट सामिल आहे.

Car Driving शिकायचं आहे?Maruti Suzukiने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

Honda Jazz 33,147 रुपयांच्या सूटसह विक्रीसाठी उपलब्ध आहे. प्रीमियम हॅचबॅकवर 10000 रुपयांच्या रोख सूटसह, 12,147 रुपये FOC अ‍ॅक्सेसरीज तसंच 5000 रुपये कार एक्सचेंज सूट आहे. त्याशिवाय 5000 रुपये लॉयल्टी बोनस, 7000 रुपये होंडा कार एक्सचेंज बोनस आणि 4000 रुपये कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे. Honda City 20000 रुपयांपर्यंतच्या बेनिफिट्ससह उपलब्ध आहे.

First published:

Tags: Car, Discount offer