नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर होंडा कंपनी तुमच्यासाठी एक उत्तम ऑफर घेऊन आली आहे. या ऑफरअंतर्गत तुम्हाला कारखरेदीवर 64 हजार रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. नोव्हेंबर महिन्यात, होंडाच्या काही निवडक मॉडेल्सवर 63,144 रुपयांपर्यंतचं डिस्काउंट दिलं जातंय. ज्यामध्ये 4th आणि 5th Gen City, अमेझ, जॅझ आणि WR-V यांचा समावेश आहे. ही मॉडेल्स खरेदी करण्यास इच्छुक असलेले ग्राहक या एक्सचेंज ऑफर, रोख डिस्काउंट, बोनस आणि कॉर्पोरेट फायदे घेऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या होंडा कारवर किती ऑफर आहे.
होंडा डब्ल्युआर-व्ही
होंडा डब्ल्युआर-व्हीवर 63,144 रुपयांपर्यंतचे लाभ मिळत आहेत. WR-V च्या सर्व व्हेरियंटवर सर्वाधिक सूट मिळत आहे, ज्यामध्ये 30,000 रुपयांचं रोख डिस्काउंट किंवा 36,144 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजचा समावेश आहे. ग्राहकांना कार एक्सचेंजवर 10 हजार रुपयांची सूट आणि 7 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनसदेखील मिळू शकतो. याशिवाय 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सूटदेखील आहे.
हेही वाचा - Honda लाँच करणार 'ही' स्टायलिश ई-स्कूटर, पाहा Photos
होंडा सिटी Gen 5
होंडा सिटीवर 59,292 रुपयांपर्यंतचं डिस्काउंट मिळतंय. Honda City (Gen 5) च्या मॅन्युअल व्हेरियंटसाठी होंडा एकूण 59,292 रुपयांची सवलत देत आहे. ज्यामध्ये 30 हजार रुपयांपर्यंत रोख डिस्काउंट किंवा 32,292 रुपये किमतीच्या मोफत अॅक्सेसरीज, 10 हजार रुपये कार एक्सचेंज, 7 हजार रुपये कार एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. यासोबतच प्रत्येकी 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट मिळतोय.
दरम्यान, कारच्या सीव्हीटी व्हेरियंटवर एकूण 37 हजार रुपयांचा लाभ मिळतोय. ज्यात 20 हजार रुपयांचा कार एक्सचेंज, 7 हजार रुपयांचे कार एक्सचेंज बोनस आणि प्रत्येकी 5-5 हजार रुपयांचे लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सूट यांचा समावेश आहे.
होंडा जॅझ
होंडा जॅझ वर 25,000 रुपयांपर्यंतचे लाभ मिळत आहेत. यामध्ये कार एक्सचेंजवर 10 हजार रुपयांची सूट आणि 7 हजार रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि कारवर 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील आहे. Honda Jazz 90hpमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते.
होंडा अमेझ
होंडा अमेझवर 19,896 रुपयांपर्यंत सूट मिळतीये. ग्राहकांना 5 हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस, 3 हजार रुपयांची कॉर्पोरेट सवलत, 10 हजार रुपयांची रोख सूट किंवा 11,896 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज मिळू शकतात. अमेझ 90hp, 1.2-लीटर पेट्रोल इंजिन किंवा 100hp, (80hp ऑटोमॅटिक) 1.5-लीटर डिझेल इंजिनसह येते.
होंडा सिटी (Gen 4)
होंडा सिटीवर 5 हजार रुपयांपर्यंतचं डिस्काउंट मिळतंय. Gen 4 City या महिन्यात फक्त 5 हजार रुपयांच्या लॉयल्टी बोनससह ऑफर केली जात आहे. मिडसाइझ सेडान 2014 पासून मार्केटमध्ये असून डिसेंबर 2022 मध्ये ती बंद होण्याची शक्यता आहे. होंडा सिटी (Gen 4) मध्ये 119hp, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car, Technology