नवी दिल्ली, 7 जानेवारी : जर तुम्हीही सेकंड हँड कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. होंडा कार्सकडून तुम्ही थेट होंडा आणि इतर कंपन्यांचे तुमच्या आवडीचे मॉडेल खरेदी करू शकता. यासाठी कंपनी अनेक ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला एक वर्ष किंवा 20000 किलोमीटरची वॉरंटी मिळेल. तसंच कारसाठी 350 क्वालिटी चेकपॉईंट इन्स्पेक्शनची सुविधा मिळेल. कंपनी आपल्या सेकंड हँड कार प्लॅटफॉर्म Honda Auto Terrace द्वारे कस्टमर्सला ही ऑफर देत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यात होंडाकडून सर्टिफाइड कार खरेदीची संधी मिळेल. म्हणजेच संपूर्ण तपासलेली, दुरुस्त केलेली, चांगल्या स्थितीतील कार खरेदी करता येईल. यात होंडा कारमध्ये Honda Amaze, Honda City, Honda Jazz मॉडेल खरेदी करू शकता. त्याशिवाय दुसऱ्या कार कंपन्यांच्या कार्सही खरेदी करता येतील. या कार्सची किंमती वेगवेगळ्या शहरांत वेगवेगळी असू शकते. Honda City कार 2017 पासून 2020 पर्यंतचे मॉडेल खरेदी करता येतील.
काय असेल किंमत?
सेकंड हँड Honda City कार 2017 चं मॉडेल कमीत-कमी 5 लाख रुपयांत खरेदी करता येईल. लेटेस्ट 2020 मॉडेल Honda City साठी 14 ते 15 लाख रुपये द्यावे लागतील. तसंच Honda Amaze कारचं 2014 चं मॉडेल 2.65 लाख रुपयांत खरेदी करता येऊ शकतं.
इतर सेकंड हँड कार्सदेखील खरेदीची संधी -
Honda Auto Terrace प्लॅटफॉर्मवर होंडाशिवाय मारुति सुझुकी, Hyundai सह इतर कंपन्यांच्या कार्सदेखील खरेदी करता येतील. यात 2014 चं मॉडेल Maruti Suzuki Alto कार 1.95 लाख रुपयांत खरेदी करता येईल. त्याशिवाय 2012 चं मॉडेल Maruti Suzuki Dzire 2.27 लाख रुपयांत, 2009 चं मॉडेल Hyundai i10 Era केवळ 95 हजारांत खरेदी करता येईल. 2013 चं मॉडेल Fiat Grande Punto कार 1.75 लाख रुपयांत खरेदी करता येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.