मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

होंडाची दमदार Africa Twin ची विक्री सुरू, किंमत आहे तब्बल 15.25 लाख!

होंडाची दमदार Africa Twin ची विक्री सुरू, किंमत आहे तब्बल 15.25 लाख!

. या बाईकच्या मॅन्युअल ट्रांसमिशनची किंमत 15.35 लाख आहे तर  ड्युल क्लच ट्रांसमिशन ट्रिम व्हर्जनची किंमत 16.10 लाख रुपये आहे.

. या बाईकच्या मॅन्युअल ट्रांसमिशनची किंमत 15.35 लाख आहे तर ड्युल क्लच ट्रांसमिशन ट्रिम व्हर्जनची किंमत 16.10 लाख रुपये आहे.

. या बाईकच्या मॅन्युअल ट्रांसमिशनची किंमत 15.35 लाख आहे तर ड्युल क्लच ट्रांसमिशन ट्रिम व्हर्जनची किंमत 16.10 लाख रुपये आहे.

मुंबई, 29 जून : होंडा मोटारसायकल आणि स्कूटर इंडिया म्हणजेच HMSI एचएमएसआयने आपली सुपर बाईक 1000 हजार सीसी क्षमतेची  अफ्रीक ट्वीन अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्सची डिलेव्हरी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील बाईकची डिलेव्हरी पूर्ण झाली आहे. या बाईकच्या मॅन्युअल ट्रांसमिशनची किंमत 15.35 लाख आहे तर  ड्युल क्लच ट्रांसमिशन ट्रिम व्हर्जनची किंमत 16.10 लाख रुपये आहे.

'होंडाने यावर्षी ब्रँड न्यू 2020 अफ्री ट्वीन अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट मार्च महिन्यात लाँच केली होती.  या बाइकसाठी टॉप बॉक्स, वाइजर, क्विक शिफ्टर, मेन स्टँड, रेल स्टेप, इंजिन गार्ड, फ्रंट फॉग लाइट आणि विंडस्क्रीन सारख्या अ‍ॅक्सेसरीजही लाँच करणार आहे' असं एचएमएसआयचे सेल्स अँड मार्केटिंगचे व्यवस्थापक यदविंदर सिंह गुलेरिया यांनी सांगितले.

या बाइकचे दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहे. मॅन्युअर आणि ऑटोमेटिक  DCT व्हर्जन्समध्ये  प्रत्येकी मायलेज हे 20.4 kmpl आणि 20.8 kmpl मिळेल. या बाइकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रस्त्यावर चालवण्यासाठी वेगवेगळे ऑटोमॅटिक मोड दिले आहे. यामध्ये एकूण 6 रायडिंग मोड टूर, अर्बन, ग्रेवल, ऑफ रोड आणि दोन युजर मोड दिले आहे.

एकापेक्षा एक! जुलैमध्ये लाँच होणार या 5 दमदार कार, जाणून घ्या फिचर्स

2020 Honda Africa Twin मध्ये कॉर्नरिंग ABS, रियर लिफ्ट कंट्रोल, व्हीली कंट्रोल, होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल, क्रूज कंट्रोल सिस्टम आणि कॉर्नरिंग लाइट्स दिले आहे. तसंच समोरील चाकाचे  ABS पूर्णपणे बंदही करता येते. त्याचबरोबर या बाईकमध्ये  LED लायटिंग, 6.5 इंच कलर TFT टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट मिळेल. या बाइकमध्ये जास्त इंधन साठवण्यासाठी मोठी टाकी देण्यात आली आहे. सोबतच  टॉप बॉक्स, पेनियर माउंट्स आणि वाइडर संप गार्ड सारखे फिचर्स दिले आहे.

मे महिन्यात या बाईकची डिलेव्हरी सुरू होणार होती. पण, लॉकडाउनमुळे डिलेव्हरी पुढे ढकलावी लागली होती.

संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Honda