मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Hit and Run : नुकसान भरपाईची रक्कम आता 2 लाख होणार? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

Hit and Run : नुकसान भरपाईची रक्कम आता 2 लाख होणार? वाचा काय आहे सरकारचा प्लॅन

सरकारने हिट अँड रन (Hit and Run) रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना, तसंच अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट : सरकारने हिट अँड रन (Hit and Run) रस्ते अपघातात (Road Accident) मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना, तसंच अपघातग्रस्तांना मिळणाऱ्या रकमेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने ही रक्कम 25 हजार रुपयांवरुन वाढवून 2 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हिट अँड रन रस्ते अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी रक्कम वाढवण्यासाठी एक योजना प्रस्तावित केली आहे. ज्यात रस्ते अपघातात गंभीररित्या जखमी झाल्यास 50000 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाने बुधवारी अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार, हिट अँड रन दुर्घटनेत पीडितांसाठी नुकसान भरपाईच्या रकमेत बदल करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. गंभीर जखमींसाठी 12,500 रुपयांवरुन 50000 रुपये आणि मृत्यू झालेल्यांसाठी 25000 रुपयांवरुन 200000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. ही योजना 1989 मध्ये केलेल्या भरपाई योजनेच्या जागी लागू केली जाईल.

Bike वर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम, असा करावा लागणार टू-व्हिलरवर प्रवास

2019 मध्ये दिल्लीत 536 लोकांचा मृत्यू -

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच राज्यसभेत 2019 मध्ये दिल्लीत हिट अँड रन रस्ते अपघातात 536 लोकांचा मृत्यू झाला, तर 1655 लोक जखमी झाल्याची माहिती दिली होती. मंत्रालयाने या प्रस्तावित योजनेसाठी 30 दिवसांत अभिप्राय मागितला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 दरम्यान देशात एकूण झालेल्या 4,49,002 रस्ते अपघातात, 1,51,113 लोकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, ड्राफ्ट स्कीमअंतर्गत, मंत्रालयाने रस्ते अपघातांची सविस्तर तपासणी, अपघाताचा तपशीलवार अहवाल तसंच हे दावे लवकरात लवकर मार्गी काढण्यासाठी वेळ मर्यादेसाठीही प्रस्ताव दिला आहे. सरकार मोटर व्हिकल अॅक्सिडेंट फंड तयार करेल, ज्याचा वापर हिट अँड रनप्रकरणात नुकसान भरपाई आणि जखमींच्या इलाजासाठी केला जाईल.

First published:

Tags: Accident