Home /News /auto-and-tech /

Hero ची आली आतापर्यंतची सर्वात वेगवान बाइक, 4.7 सेंकदात सुसाट

Hero ची आली आतापर्यंतची सर्वात वेगवान बाइक, 4.7 सेंकदात सुसाट

कंपनीने Xtreme 160R BS6 इंजिनसह फेब्रुवारीमध्ये लाँच केली होती. मार्चमध्ये ही बाईक उपलब्ध होईल अशी शक्यता होती पण...

    मुंबई, 24 जून : लॉकडाउन (Lockdown)च्या काळात ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला होता. लॉकडाउन 5 मध्ये अटी शिथिल करण्यात आल्यामुळे आता पुन्हा एकदा ऑटो इंडस्ट्री हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनेक कंपन्यांनी नवनवीन मॉडेल लाँच केली जात आहे. Hero MotoCorp नेही आपले दमदार आणि शानदार मॉडेल Hero Xtreme 160R च्या टेस्ट राइडसाठी बुकिंग सुरू केली आहे. कंपनीने  Xtreme 160R BS6 इंजिनसह फेब्रुवारीमध्ये लाँच केली होती. मार्चमध्ये ही बाईक उपलब्ध होईल अशी शक्यता होती. पण लॉकडाउन लागू झाल्यामुळे ही गाडी बाजारात येऊ शकली नाही. आता पुन्हा एकदा हिरोने Xtreme 160R बाजारात उतरवणार आहे. Hero Xtreme 160R मध्ये 160सीसी इंजिन आहे जे 15hp आणि 14 nm चा टॉर्क जनरेट करतो. या बाईकमध्ये 5 स्पीड ट्रांसमिशन देण्यात आले आहे.  अवघ्या 4.7 सेंकदात ही बाईक 0-60kmph चा वेग गाठते, असा दावा कंपनीने केला आहे. लज्जास्पद! भररस्त्यात गळा चिरुन पत्नीची हत्या, जमाव VIDEO करीत विचारत होता... या बाइकमध्ये  शेप्ड LED हेडलॅम्प देण्यात आला आहे. बाइकमध्ये वाइड हॅन्डलबार, मस्कुलर फ्यूल टँक, ब्लॅक-आउट इंजन बे, स्टेप-अप सीट, LED टर्न इंडिकेटर्स सह LED टेल लाइट आणि ब्लॅक अलॉय व्हील्स दिले आहे. त्याचबरोबर या बाइकमध्ये सस्पेंशन सिस्टीमवर जास्त भर दिला आहे. ही बाइन ट्युबलर डायमंड फ्रेमवर तयार करण्यात आली आहे.  यात पुढे टेलिस्कॉपिक (37 mm Dia) सह  अँटी फ्रिक्शन बुश सस्पेंशन आणि रियरमध्ये 7 स्टेप राइडर-एडजेस्टमेंट मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. ही बाइक दोन प्रकारात बाजारात उतरवण्यात येणार आहे. यात एक बाइक ही फ्रंट डिस्क आणि ड्यूल डिस्क (फ्रंट व रियर डिस्क) सोबत असणार  आहे. Hero Xtreme 160R च्या समोर 276 mm पेटल डिस्क, सिंगल चॅनल एबीएस आणि रियरमध्ये 220 mm पेटल डिस्क किंवा 130 mm ड्रम ब्रेक हा पर्याय असणार आहे. डोकं जोडलेलं असूनही वेगवेगळे पेपर लिहून सयामी जुळ्या झाल्या दहावी पास Hero Xtreme 160R ला स्पोर्टी आणि अग्रेसिव्ह लूक देण्यात आला आहे. ही  बाइक  ग्रे-स्पोर्ट्स रेड, ग्रे-ब्लू आणि ग्रे-व्हाइट या 3 रंगात उपलब्ध असणार आहे. बाजारात या बाइकचा थेट मुकाबला हा Bajaj Pulsar NS160, TVS Apache RTR 160 4V आणि Suzuki Gixxer सोबत असणार आहे. संपादन - सचिन साळवे
    First published:

    पुढील बातम्या