Home /News /auto-and-tech /

आता Hero ने दिला ग्राहकांना झटका, कंपनीने घेतला मोठा निर्णय

आता Hero ने दिला ग्राहकांना झटका, कंपनीने घेतला मोठा निर्णय

Hero Motocorp कंपनीने आपल्या तिमाही आणि मासिक विक्रीचे आकडे जाहीर केले आहे.

    नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर : देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादन कंपनी हीरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) ने आपल्या ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे.  कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या महिन्यापासून हीरोच्या दुचाकीच्या किंमती महागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात दुचाकी विक्रीत वाढ करण्यासाठी हीरोने हा निर्णय घेतला. यापुढे हीरोच्या प्रत्येक उत्पादनात 2 टक्यांनी वाढ केली आहे. ही दरवाढ 1 ऑक्टोबरपासून लागूही करण्यात आली आहे. ही दरवाढ मोटरसायकल (motorcycle) आणि स्कूटर मॉडल (scooter) आणि बाजारातील किंमतीवर वेगवेगळी असणार आहे. मुंबई पोलिसांवर आरोप करणारे तोंडावर आपटले, सेनेचा सणसणीत टोला Hero Motocorp कंपनीने आपल्या तिमाही आणि मासिक विक्रीचे आकडे जाहीर केले आहे. यात Hero Motocorp ची मागील सप्टेंबर महिन्यात विक्री ही 16.9 टक्क्यांने वाढली आहे. तब्बल 7,15,718 वाहनांची विक्री झाली आहे. तर मागील वर्षी कंपनी सप्टेंबर महिन्यातच 6,12,204 वाहनांची विक्री केली होती. वाहनांचे साहित्य आणि लॉजिस्टिकमध्ये समस्या निर्माण झाली होती. पण तरीही जुलै आणि सप्टेंबर महिन्यात विक्री 7.3 टक्यांनी वाढली असून 18,14,683 वाहन विक्री झाली आहे.तर  2019-20 च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने 16,91,420 वाहनांची विक्री केली होती. विवेक राहाडे आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण, सुसाइड नोट निघाली बनावट कोरोनाच्या काळात बाजारपेठा बंद होत्या. सर्वत्र लॉकडाउन लागू झाल्यामुळे वाहन विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. पण, आता विक्रीत वाढ झाली आहे.  कंपनीचे उत्पादन आता 100 टक्के क्षमतेनं सुरू झाले आहे. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये सण उत्सवात आणखी मोठ्या प्रमाणात विक्री होईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.  लवकरच येत आहे दमदार स्कूटर अलीकडे हीरो मोटोकॉर्पने BS6 इंजिन असलेली Maestro Edge 110 स्कूटर नव्याने बाजारात आणणार आहे. लवकरच या नव्या स्कूटरचा लाँचिंग सोहळा पार पडणार आहे.  Maestro Edge 110 ची काही माहिती लाँचच्या आधीच समोर आली आहे. या नव्या स्कूटरला स्पोर्टी लूक दिला आहे. त्याचबरोबर या स्कूटरच्या टेस्ट रायडिंगसाठी रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू केले आहे.  हीरो मोटोकॉर्पचा हा स्कूटर 6 रंगात येणार आहे. तसंच नवे ग्राफिक्स आणि 110cc सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात येणार आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या