विद्यार्थ्यांच्या बाईकसाठी चक्क सरकार देणार पैसे; E bike च्या प्रचारार्थ मोहीम

विद्यार्थ्यांच्या बाईकसाठी चक्क सरकार देणार पैसे; E bike च्या प्रचारार्थ मोहीम

विद्यार्थ्यांनी बाईक खरेदी करावी यासाठी सरकारकडूनच पैसे मिळाले तर? खोटं नाही, ही अगदी खरी बातमी आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी रीतसर अशी घोषणा केली आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 18 सप्टेंबर : सरकार गरजूंना घर घेण्यासाठी, शेतकऱ्यांना बियाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुदान, कर्ज, शिष्यवृत्तीच्या स्वरूपात मदत देत असतं, हे आपल्याला माहीत आहे. पण चक्क विद्यार्थ्यांनी बाईक खरेदी करावी यासाठी सरकारकडूनच पैसे मिळाले तर? खोटं नाही, ही अगदी खरी बातमी आहे. गुजरात सरकार विद्यार्थ्यांना वाहन खरेदीसाठी 12 हजार रुपयांची मदत देणार आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या नव्या योजनेची घोषणा शुक्रवारी केली.

गुजरात सरकारने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना इ-बाईक घेण्यासाठी 12 हजार रुपये मदत केली जाणार आहे.  मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मात्र केवळ शालेय विद्यार्थ्यांना ही मदत मिळणार असून इतर नागरिक याचा लाभ घेऊ शकणार नाहीत.

इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून 10 हजार वाहनांवर ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर ई-रिक्षा घेण्यासाठी देखील 48 हजार रुपयांची मदत सरकार देणार आहे. प्रदूषण आणि इतर गोष्टी ध्यानात घेत सरकारने या वाहनांचा वापर वाढावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. जवळपास 5 हजार रिक्षांसाठी मदत दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी सरकारच्या पंचशील या योजनेची घोषणा केली. या वाहनांवर दिली जाणारी मदत हीदेखील याच योजनेचा एक भाग आहे. या वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन देखील उभारली जाणार आहेत. यासाठी त्यांनी 50 लाख रुपयांच्या योजनेची घोषणा केली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री रूपाणी म्हणाले, 'राज्यात मोठ्या प्रमाणात सोलर एनर्जीचा वापर करण्यात येत आहे. भविष्यात गुजरातला पूर्णपणे नैसर्गि, अपारंपरिक ऊर्जेवर चालवणाऱ्याचा आमचा प्रयत्न आहे. मागील काही वर्षांत आम्ही यासाठी कष्ट घेतले असून यांसारख्या काही गोष्टीतून आपण गुजरातला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या राज्यात 510 मेगावॅट विजेची निर्मिती केली जात आहे, मागील तीन वर्षात 38 लाख घरांना आपण वीज सबसिडी दिलेली आहे."

दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण अनुकूल गुजरातसाठी हवामान बदल विभागाच्या वतीने "Building a Climate Resilience Gujarat: A Decade of Climate An e-launch of "Roadmap for the Future" या पुस्तकाच्या इ-बुक आवृत्तीचं अनावरण करण्यात आलं.

ई बाईकसाठी विद्यार्थ्यांना अनुदान देणारं गुजरात हे बहुधा पहिलंच राज्य असावं.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 18, 2020, 6:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या