Home /News /auto-and-tech /

तरुणाने गाडीच्या नंबर प्लेटसाठी मोजले 1 कोटी 28 लाख; कारण ऐकून थक्क व्हाल !

तरुणाने गाडीच्या नंबर प्लेटसाठी मोजले 1 कोटी 28 लाख; कारण ऐकून थक्क व्हाल !

आवडत्या आकड्याची नंबर प्लेट घेण्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च कराल? या पठ्ठ्याने नंबर प्लेटसाठी चक्क 1 कोटी 28 लाख खर्च केले आहेत. त्याला कारणही तेवढंच खास आहे.

    बर्मिंगहॅम, 17 नोव्हेंबर: जगभरात महागड्या वाहनांचे शौकीन आपण बघत असतो. मग ते गाडीतील इंटिरिअर बदलून घेतात. रंग बदलतात. इतर मॉडिफिकेशन करतात तर कुणी आवडत्या क्रमांकाची नंबर प्लेट खरेदी करण्यासाठी कितीही पैसे मोजण्यासाठी तयार असतात. त्याचबरोबर गाड्या मॉडिफाय करण्यासाठी देखील हवी तितकी रक्कम मोजण्यासाठी देखील तयार असतात. नुकतीच अशा प्रकारची एक घटना समोर आली असून एका व्यक्तीने आवडत्या नंबरप्लेटसाठी 1 कोटी 28 लाख रुपये मोजले आहेत. ‘0 10’या नंबर प्लेटसाठी त्याने ही भलीमोठी रक्कम मोजली आहे. यामागे त्याचे एक भावनिक कारण असून motor1.com च्या रिपोर्टनुसार, बर्मिंगहॅममध्ये 1902 साली पहिल्यांदा गाड्यांना नंबर प्लेट बसवण्यात आल्या होत्या. त्या वाटताना  ही नंबरप्लेट नातवाच्या आजोबांच्या नावाने इश्यू झाली होती. त्यावेळी नंबर प्लेट घेण्यासाठीच्या रांगेमध्ये 10 व्या क्रमांकावर होते. त्याच्या आजोबांचे नाव चार्ल्स थॉम्पसन असून 1874 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. ग्रेटर बर्मिंगहॅममध्ये होलसेल स्टेशनरी विक्री करण्याची त्यांची कंपनी होती. 1955 मध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर या गाडीची मालकी आणि नंबर प्लेटची मालकी त्यांच्या मुलाकडे म्हणजे नंबर प्लेट खरेदी करणाऱ्याच्या वडिलांकडे आली. या मुलाचे वडील बॅरी थॉम्पसन हे देखील या युनिक नंबर प्लेटचे फॅन होते. त्यामुळे आपल्या काकांच्या टिंबरच्या व्यवसायासाठीही बॅरी हीच गाडी वापरायचे. दुर्दैवाने 2017 मध्ये बॅरी यांचं निधन झाल्यानंतर स्थानिक ड्रायव्हर्स आणि वाहन परवाना एजन्सी (डीव्हीएलए) ने  या कुटुंबाच्या गाड्यांच्या नंबर प्लेट रिटेन्शनमध्ये ठेवल्या. बॅरी यांच्याकडे ऑस्टिन ए 35, मिनी, फोर्ड कोर्टिना आणि जग्वार या गाड्या होत्या आणि त्यांच्या नंबर प्लेटही वैशिष्ट्यपूर्ण होत्या. या नंबर प्लेट एजन्सीने 2017 पासून 13 नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक करून ठेवल्या होत्या. यानंतर करण्यात आलेल्या सिल्व्हरस्टोन लिलावात ही नंबर प्लेट चार्ल्स थॉम्पसन यांच्या नातवाने मोठी रक्कम देऊन खरेदी केली.  या लिलावाची माहिती त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. 1902 मध्ये हा क्रमांक मार्केटमध्ये आल्यानंतर  '0 10' या क्रमांकाला £128,800 म्हणजेच 1 कोटी 28 लाख रुपये इतकी रक्कम देऊन खरेदी करण्यात आले आहे.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Car

    पुढील बातम्या