मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /Google Pixel 7: नेत्रहीन लोकांनासुद्धा टिपता येणार फोटो; अनोख्या फिचर्ससह स्मार्टफोन लॉन्च

Google Pixel 7: नेत्रहीन लोकांनासुद्धा टिपता येणार फोटो; अनोख्या फिचर्ससह स्मार्टफोन लॉन्च

स्मार्टफोन

स्मार्टफोन

सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट 'गुगल' अतिशय उपयुक्त ठरत आहे. गुगलशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या गुगलने स्मार्टफोन निर्मितीही सुरू केलेली आहे.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 7 ऑक्टोबर-  सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात टेक जायंट 'गुगल' अतिशय उपयुक्त ठरत आहे. गुगलशिवाय आपण आपल्या फास्ट फॉरवर्ड डेली लाईफची कल्पनाही करू शकत नाही. जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या गुगलने स्मार्टफोन निर्मितीही सुरू केलेली आहे. नुकतंच कंपनीने गुगल पिक्सल 7 , पिक्सल 7 प्रो  हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या फोनमध्ये कंपनीनं कॅमेऱ्यासह एक नवीन फीचर दिलं आहे. या फीचरमुळे ज्या व्यक्ती दृष्टिहीन आहेत त्यादेखील फोटो क्लिक करू शकणार आहेत. एवढेच नाही तर यूजर्स हाय क्वालिटी फोटो आणि व्हिडिओही क्लिक करू शकतील.

    गुरुवारी (6 ऑक्टोबर 22) संध्याकाळी अमेरिकेत आयोजित केलेल्या 'मेड बाय गुगल' या इव्हेंटमध्ये कंपनीनं हे दोन्ही मोबाईल लाँच केले आणि फीचर्स सांगितली. गुगलची पिक्सल सीरिज केवळ क्लीन आणि स्मूद अँड्राईड एक्सपिरियन्सपुरतीच मर्यादित नाही. या सीरिजमधील फोनच्या माध्यमातून युजर्सना टिकाऊ डिझाइन, उत्तम फोटोग्राफी फीचर्स आणि मजबूत सुरक्षा मिळेल. या फोनमधील मशीन लर्निंग अल्गोरिदममुळे फोटो क्लिक केल्यानंतर त्याची क्वालिटी वाढवता येते. तसंच, डोळ्यांनी बघू न शकणारी व्यक्ती केवळ व्हॉईस कमांडद्वारे फोटो क्लिक करू शकणार आहे.गुगल पिक्सल 7 आणि पिक्सल 7 प्रोमध्ये देण्यात आलेल्या कॅमेरा फीचर्सबद्दल या ठिकाणी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

    (हे वाचा:तब्बल 108MP कॅमेरा अन् दमदार फीचर्ससह स्मार्टफोन, वाचा डिटेल्स )

    सिनेमॅटिक ब्लर फीचरमुळे फोटोला प्रोफेशनल टच

    Google Pixel 7 Pro आणि 7 या फोनमध्ये, फोटो आणि व्हिडिओंना चांगला लूक आणि प्रोफेशनल टच देण्यासाठी कंपनीनं सिनेमॅटिक ब्लर फीचर देऊ केलं आहे. या फीचरमुळे फोटो आणि व्हिडिओला ‘डेप्थ

    ऑफ फील्ड’ मिळतं.

    फोटोतील ब्लरनेसही काढता येणार

    Google Pixel 7 Pro आणि Pixel 7 मध्ये देण्यात आलेल्या नवीन फीचर्सच्या मदतीनं कोणत्याही डिजिटल फोटोमधून ब्लरनेस काढून टाकणं शक्य होणार आहे. मात्र, ही फीचर्स कितपत अचूकपणे काम करतील, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही. याशिवाय, या फोनमध्ये व्हिडिओतील बॅकग्राउंड नॉईजही क्लिअर करता येणार आहे. यासाठी कंपनीकडून मशीन लर्निंगचा वापर केला जाणार आहे.

    क्विक आणि अॅक्युरेट नाईट साईट फोटोसाठी ML Denoiser

    Google Pixel 7 आणि Pixel 7 Pro या फोनच्या कॅमेरामध्ये ML Denoiser फीचर्स दिली आहेत. कंपनीचा दावा आहे, की या फीचर्समुळे अत्यंत कमी प्रकाशातही क्रिस्प फोटो क्लिक करणं शक्य होणार आहे. गुगलच्या या पूर्वीच्या फोनच्या तुलनेत आता ही प्रक्रिया दुप्पट वेगाने होईल.

    (हे वाचा:भारतात 5G सेवा सुरू! 20,000 रुपयांखालील हे आहेत बजेट 5G स्मार्टफोन )

    फोटोमध्ये दिसणार रिअल टोन

    गुगलने Pixel 6 फोनमध्ये रिअल टोन फीचर दिलं होतं. आता लाँच झालेल्या दोन्ही फोनमध्ये कंपनीने हेच फीचर अधिक प्रभावी केलं आहे. त्यामुळे आता युजर्सच्या चेहऱ्यावरील अनावश्यक डार्कनेस कमी करता येणार असल्याचं गुगलचं म्हणणं आहे. तसंच, या फीचरमुळे नाईट शूट्स अधिक चांगली होतील, असंही कंपनीचं म्हणणं आहे.नवीन लाँच केलेले फोन खरेदी करण्यासाठी गुगलने आपल्या युजर्ससाठी प्री-ऑर्डरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कंपनीच्या GoogleStore.com या ऑनलाइन स्टोअर वरून फोनची खरेदी करता येऊ शकते.

    First published:

    Tags: Smartphone, Technology