मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

गुगल पिक्सेल 7 सीरिज लवकरच भारतात लॉंच होणार; नव्या सीरिजमध्ये असतील 'ही' खास फीचर्स

गुगल पिक्सेल 7 सीरिज लवकरच भारतात लॉंच होणार; नव्या सीरिजमध्ये असतील 'ही' खास फीचर्स

google pixel 7

google pixel 7

गुगल पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रोचं पुढच्या महिन्यात भारतासह जागतिक लॉंचिंग होणार आहे. नवीन पिक्सेल 7 चा लूक पिक्सेल 6 सीरिजसारखाच आहे. यात डिव्हाइसच्या वरच्या बाजूला आडवा कॅमेरा व्हिझरबार देण्यात आला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

लवकरच सणासुदीला सुरुवात होत आहे. नवरात्रौत्सव, दसरा आणि त्यानंतर दिवाळी असे महत्त्वाचे सण एकामागोमाग एक येत असल्याने बाजारात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. आगामी सणांच्या अनुषंगाने बाजारात विविध प्रकारची खास उत्पादनं दाखल होऊ लागली आहेत. ई-कॉमर्स वेबसाइट्सवर सेल, ऑफर, डिस्काउंट आदी पाहायला मिळत आहेत. सणासुदीला कपडे, गृहोपयोगी वस्तूंसोबतच मोबाइल, लॅपटॉपसह अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सना मोठी मागणी असते. तुम्हीदेखील सणासुदीच्या निमित्ताने नवा स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण गुगल कंपनी लवकरच पिक्सेल 7 सीरिज लॉंच करणार आहे. गुगल पिक्सेलच्या या नव्या सीरिजमध्ये खास फीचर्स देण्यात आली आहेत. गुगलची ही नवीन सीरिज पुढील महिन्यात लॉंच होणार आहे. 'टेकगिग डॉट कॉम'ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

गुगल पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रोचं पुढच्या महिन्यात भारतासह जागतिक लॉंचिंग होणार आहे. नवीन पिक्सेल 7 चा लूक पिक्सेल 6 सीरिजसारखाच आहे. यात डिव्हाइसच्या वरच्या बाजूला आडवा कॅमेरा व्हिझरबार देण्यात आला आहे.

गुगलने यापूर्वी भारतात फ्लॅगशिप पिक्सेल स्मार्टफोन रिलीज केले नव्हते. त्याऐवजी गुगलने भारतात कमी किमतीचे ए-सीरिज फोन उपलब्ध करुन देण्याचा पर्याय निवडला होता. त्यामुळे भारतात पिक्सेल 7 सीरिज लॉंच होईल की नाही हे स्पष्ट नव्हतं; पण आता गुगल भारतात पिक्सेल 7 सीरिज लॉंच करणार आहे.

(चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी)

नवीन पिक्सेल 7 सीरिजमधल्या स्मार्टफोनचा लूक पिक्सेल 6 सीरिज सारखाच आहे. यात डिव्हाइसच्या वरच्या बाजूला आडवा कॅमेरा व्हिझरबार देण्यात आला आहे. पिक्सेल 6 सीरिजमध्ये कॅमेराचा बार काळ्या रंगाचा आणि धातूचा आहे, त्यामुळे ठळक आणि वेगळा दिसतो. गुगल पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो या दोन्ही नवीन स्मार्टफोन्समध्ये टेन्सर G2 चिप असण्याची शक्यता आहे. गुगल पिक्सेल 6 सीरिजमध्ये टेन्सर चीप होती. गुगलची ही दुसरी अंतर्गत स्मार्टफोन चिप आहे; मात्र पिक्सेल 7 सीरिजमध्ये या चिपऐवजी टेन्सर G2 चिप असेल. गुगल पिक्सेल 7 मध्ये इमेजेस, व्हिडिओज, सिक्युरिटी आणि स्पीच रेकग्निशनसाठी काही खास पर्सनलाइज्ड फीचर्स देण्यात येतील, असं गुगलने म्हटलं आहे. याशिवाय या नवीन स्मार्टफोनमध्ये 50 MP कॅमेरा, अँड्रॉइड 13, 120Hzचा डिस्प्ले आदी फीचर्स असण्याची शक्यता आहे.

नवीन पिक्सेल 7 सीरीज फोनचं एक पोस्टर फ्लिपकार्ट इंडियावरच्या नवीन मायक्रोसाइटवर दिसून आलं असून, त्यावर कमिंग सून असं लिहिलं होतं. त्यावरून पुढच्या महिन्यात हे फोन भारतात उपलब्ध होऊ शकतात, अशी चर्चा आहे.

गुगल 6 ऑक्टोबर रोजी पिक्सेल 7 आणि पिक्सेल 7 प्रो हे पिक्सेल 7 सीरिजमधले नवे स्मार्टफोन लॉंच करणार आहे. गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या गुगल आय/ओ 2022 इव्हेंटमध्ये पिक्सेल 7 सीरिजचं प्रथम अनावरण केलं होतं. गुगल पिक्सेल 7 सीरिजमधल्या फीचर्सबाबत संपूर्ण माहिती गुगल या फोनच्या लॉंचिगच्या वेळी म्हणजेच 6 ऑक्टोबरला देणार आहे.

First published:

Tags: Google