Home /News /auto-and-tech /

Google च्या या App मुळे तुमच्या फोनला धोका, हे App तातडीने करा डिलीट

Google च्या या App मुळे तुमच्या फोनला धोका, हे App तातडीने करा डिलीट

गूगलचं मेसेजिंग अ‍ॅप Allo लाँच झाल्यानंतर ते 2018 मध्ये बंद करण्यात आलं. आता हे अ‍ॅप आता सुरू नाही पण तरीही काहीजणांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप अजूनही डाऊनलोड केलेलं आहे. पण यामुळे तुमच्या फोनला धोका पोहोचू शकतो.

    मुंबई, 4 जानेवारी : गूगलचं मेसेजिंग अ‍ॅप Allo लाँच झाल्यानंतर ते 2018 मध्ये बंद करण्यात आलं. आता हे अ‍ॅप आता सुरू नाही पण तरीही काहीजणांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप अजूनही डाऊनलोड केलेलं आहे. पण यामुळे तुमच्या फोनला धोका पोहोचू शकतो. हुवावे कंपनीच्या स्मार्टफोनच्या युजर्सच्या फोनवर एक मेसेज फ्लॅश होतो. तुमच्या फोनमध्ये व्हायरस शिरला आहे आणि त्यामुळे हे अ‍ॅप फोनमधून लगेच डिलीट करणं गरजेचं आहे, असा तो मेसेज आहे. अँड्रॉइड ऑथॉरिटीवर आलेल्या बातमीनुसार Google Allo बद्दल अशी वॉर्निंग Huawei P20 Pro सोबत Huawei Mate Pro वरही आलीय. हुवावे फोनमध्ये Allo हे अ‍ॅप सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याचं मानलं जातंय. या फोनमध्ये काही तांत्रिक दोष आहे की Allo मध्ये हे स्पष्ट झालेलं नाही. पण जर हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असेल तर ते तातडीने डिलीट करावं, असा इशारा देण्यात आलाय. हे अ‍ॅप आधीच बंद झाल्यामुळे याबदद्लचे सुरक्षा अपडेट्स येणंही बंद झालं आहे. (हेही वाचा : Indigo एअरलाइन्सला पुणेकरांनी दिला दणका, झुरळामुळे पडला एवढा भुर्दंड) काय आहे गुगल Allo ? गुगलने हे स्मार्ट मेसेजिंग अ‍ॅप 2016 मध्ये लाँच केलं होतं. हे इस्ंटट मेसेजिंग अ‍ॅप होतं. तुम्हाला एखाद्या मेसेजला रिप्लाय द्यायचा असेल तर तो मेसेज वाचून हे अ‍ॅप तुम्हाला रिप्लाय सुचवत होतं. पण हे अ‍ॅप गूगलने 2018 मध्ये बंद केलं. यानंतर युझर्नसना चॅट बॅकअप घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पण काहीजणांच्या फोनमध्ये ते अ‍ॅप तसंच राहिलं. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा अलर्ट देण्यात आला आहे. ============================================================================================
    Published by:Arti Kulkarni
    First published:

    Tags: Money, Technology

    पुढील बातम्या