कोरोना लस घ्या आणि 10 लाखांची कार मोफत मिळवा; याठिकाणी मिळतेय अनोखी ऑफर

लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. कोरोना वॅक्सिनचा घेणाऱ्याला नवी कार मोफत देण्यात येईल, अशी घोषणा रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतील महापौरांनी केली आहे.

लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. कोरोना वॅक्सिनचा घेणाऱ्याला नवी कार मोफत देण्यात येईल, अशी घोषणा रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतील महापौरांनी केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 जून: मागील जवळपास दीड वर्षापासून कोरोना महामारीने (Covid 19) संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोनापासून बचावासाठी सर्वच प्रभावित देशांमध्ये वॅक्सिनेशन मोहिम (vaccination drive) राबवली जात आहे. एकीकडे भारतात दिल्लीसह अनेक राज्यांत लशीची कमतरता असताना, काही देशांमध्ये मात्र नागरिक अद्यापही वॅक्सिनेशनसाठी पुढे येत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे लोकांनी लसीकरण करावं, यासाठी सरकार अनेक ऑफर देत आहे. रशियाने आपल्या देशात लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी एक अनोखी ऑफर दिली आहे. जो व्यक्ती कोरोना वॅक्सिनचा डोस घेईल, त्यांना नवी कार मोफत देण्यात येईल, अशी घोषणा रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोतील महापौरांनी केली आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॉस्कोचे महापौर सर्गेई सोबयानिन यांनी (Sergei Sobyanin) गेल्या रविवारी ही घोषणा केली. कोरोना लस घेणाऱ्याला 10 लाख रुपयांपर्यंतची ब्रँड न्यू कार फ्रीमध्ये देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. या ऑफरमुळे लसीकरण करण्याचं प्रमाण वाढेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

  (वाचा - तुमच्याजवळ कोरोना रुग्ण असेल तर वाजणार अलार्म; 15 मिनिटांत देणार धोक्याची घंटा)

  14 जूनपासून 18 वर्षावरील लोक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ऑफरचा फायदा घेण्यासाठी कोरोना वॅक्सिनचा पहिला डोस घेणं अनिवार्य आहे. लॉटरीद्वारे कार दिली जाईल आणि विजेत्याचं नाव लकी ड्रॉनुसार घोषित केलं जाईल. 11 जुलै पर्यंत ही ऑफर लागू असून दर आठवड्याला पाच कार दिल्या जातील.

  (वाचा - Helmet वर ISI मार्क अनिवार्य, अन्यथा भरावा लागेल 5 लाखांचा दंड; जाणून घ्या नियम)

  रशियात सर्वाधिक कोरोना व्हायरसचं प्रमाण मॉस्कोमध्ये आहे. राजधानी मॉस्कोमध्ये रविवारी 7,704 नवे रुग्ण आढळले. तर संपूर्ण रशियात 14,723 नवे कोरोनाबाधित आढळले.
  Published by:Karishma Bhurke
  First published: