Home /News /auto-and-tech /

पेट्रोलची चिंता नाही! 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स

पेट्रोलची चिंता नाही! 44000 रुपयात खरेदी करा ही स्कूटर,वाचा काय आहेत फीचर्स

जेमोपाय मिसो मिनी या स्कूटरची किंमत 44,000 रुपये आहे. यामध्ये हेक्सा हेडलाइट्स, LED बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 18 जुलै : जेमोपाय इलेक्ट्रिकने (Gemopai Electric)ने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर 3 वर्षांच्या सर्व्हिस वॉरंटीची घोषणा केली आहे. ही सर्व्हिस वॉरंटी तीनही स्कूटर Gemopai Astrid Lite, Gemopai Ryder आणि Gemopai Miso वर देत आहे. तीन वर्षांच्या या सर्व्हिस वॉरंटी स्कीमला कंपनीने  'Gemopai Secure' असे नाव दिले आहे. ही कंपनी गो ग्रीन इ-मोबॅलिटी आणि ओपाय इलेक्ट्रिकचे जॉइंट व्हेन्चर आहे. जेमोपाय मिसो मिनी या स्कूटरची किंमत 44,000 रुपये आहे. यामध्ये हेक्सा हेडलाइट्स, LED बॅटरी इंडिकेटर देण्यात आला आहे. स्कूटरमध्ये 1KW डिटॅचेबल Li-ion बॅटरी देण्यात आली आहे. (हे वाचा-उर्वशी रौतेलाचा स्टनिंग मॅगझिन लुक VIRAL, यावर्षी 'या' बोल्ड कव्हर फोटोंची चर्चा) कंपनी 3 वर्षासाठी 12 सर्व्हिस मोफत  देणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, जेमोपाय मिसो इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 75KM चालू शकते. ही मिनी स्कूटर 2 तासात फुल्ल चार्ज करता येते. या स्कूटरच्या देशभरात 60 पेक्षा जास्त डीलरशीप आहेत ज्याठिकाणाहून तुम्ही या स्कूटरची खरदी करू शकता. 2000 रुपयांचे डिस्काउंट कंपनीकडे सध्या देशभरात 60 पेक्षा जास्त डीलरशीप आहेत, ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस सेंटर आहेत. जेमोरपाय मिसोवर 25 जुलैपर्यंतच्या सर्व बुकिंगसाठी 2000 रुपयांची सूट देखील कंपनीकडून दिली जात आहे. भारतीय बाजाराव्यतिरिक्त ही कंपनी नेपाळमध्ये देखील स्कूटर्सची विक्री करत आहे. (हे वाचा-WhatsApp हॅक होण्यापासून वाचवायचे आहे? मग लगेच करा Settings मध्ये 'हे' बदल) 4 रंगांचे पर्याय उपलब्ध ही स्कूटर 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये फेअरी रेड (Fiery Red), डीप स्काय ब्लू (Deep Sky Blue), लुशीअस ग्रीन (Luscious Green) आणि सनसेट ऑरेंज (Sunset Orange) रंग उपलब्ध आहेत. कंपनीचे असे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसच्या संकटात एक सीटवाली स्कूटर एक सुरक्षित पर्याय आहे. ही मिनी स्कूटर वापरण्यासाठी आरटीओ परमिट गरजेचे नाही आहे. 2 तासात चार्ज होणाऱ्या या स्कूटरची टॉप स्पीड 25 KM आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Scooter ride, Technology

    पुढील बातम्या