Home /News /auto-and-tech /

Fuel Price Hike: इंधन दरवाढीचा वाहन विक्रीला फटका; आठ टक्क्यांनी घसरण

Fuel Price Hike: इंधन दरवाढीचा वाहन विक्रीला फटका; आठ टक्क्यांनी घसरण

जुलै 2022 मध्ये तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री अनुक्रमे 80 टक्के आणि 27 टक्के वाढली आहे. या महिन्यात 50,349 तीनचाकी, तर 66,459 व्यावसायिक वाहने विकली गेली.

    मुंबई, 6 ऑगस्ट : पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने आधीच नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यात आता तुलनेने स्वस्त मानलं जाणाऱ्या सीएनजीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने नागरिकांना आता स्वत:ची गाडी वापरावी की नाही याबाबत विचार करण्यास भाग पाडलं आहे. इंधन दरवाढीमुळे नवीन गाड्या घेण्याचं लोक टाळत आहेत. यामुळे वाहन विक्रीला फटका बसला आहे. प्रवासी वाहने, दुचाकी वाहने आणि ट्रॅक्टर यांच्या नोंदणीत झालेल्या घसरगुंडीमुळे जुलैमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर 8% घट झाली आहे. वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ ने (फाडा) ही माहिती जारी केली आहे. त्यानुसार, जुलै 2022 मध्ये वाहनांची एकूण किरकोळ विक्री 14,36,927 इतकी राहिली. जुलै 2021 मध्ये हा आकडा 15,59,106 होता. प्रवासी वाहनांची विक्री 5 टक्क्यांनी घटली. या महिन्यात 2,50,972 प्रवासी वाहने विकली गेली. चुकीच्या क्रेडिट स्कोअरमुळे कर्ज मिळत नसेल तर RBIकडे धाव घ्या; तुमची अडचण नक्की दूर होईल कोणत्या वाहनांची विक्री वाढली? जुलै 2022 मध्ये तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री अनुक्रमे 80 टक्के आणि 27 टक्के वाढली आहे. या महिन्यात 50,349 तीनचाकी, तर 66,459 व्यावसायिक वाहने विकली गेली. चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला, कर्जाच्या कचाट्यात अडकलात? मिळवा 'अशी' मुक्तता कधी वाढणार विक्री? नागपंचमीपासून सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात वाहनांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा ‘फाडा’ने व्यक्त केली आहे. जुलैमध्ये विक्रीचे आकडे घटले असले तरी वाहनांची नवनवीन मॉडेल बाजारात उतरवली जात आहेत. विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत वृद्धीमुळे नवे मॉडेल आणण्यात मदत मिळत आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Car, Inflation

    पुढील बातम्या