मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Mahindra Scorpio : परदेशी व्यक्तीने स्कॉर्पिओ गाडीमध्ये तयार केलं आलिशान घर; बेडरूम, किचनसह आहेत सर्व सुविधा

Mahindra Scorpio : परदेशी व्यक्तीने स्कॉर्पिओ गाडीमध्ये तयार केलं आलिशान घर; बेडरूम, किचनसह आहेत सर्व सुविधा

नॉर्मल गाड्यांमध्ये केवळ बसायला सीट्स असतात पण एका पठ्ठ्यानं कारचं रुपांतर थेट आलिशान घरात केलंय.

नॉर्मल गाड्यांमध्ये केवळ बसायला सीट्स असतात पण एका पठ्ठ्यानं कारचं रुपांतर थेट आलिशान घरात केलंय.

नॉर्मल गाड्यांमध्ये केवळ बसायला सीट्स असतात पण एका पठ्ठ्यानं कारचं रुपांतर थेट आलिशान घरात केलंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 सप्टेंबर :  अलीकडे अनेक जण छंद म्हणून आपल्या कारमध्ये किंवा एसयूव्हीमध्ये स्वतःच्या आवडीनुसार बरेच बदल करतात; पण नेदरलॅंडच्या एका व्यक्तीनं त्याच्या महिंद्रा स्कॉर्पिओ एसयूव्हीचं रूपांतर चक्क एका घरात केलं आहे. या मॉडिफाइड अर्थात सुधारित एसयूव्हीमध्ये बेडरूम, बाथरूम, किचन आणि कामाची जागादेखील आहे. ही व्यक्ती या गाडीमधून देशभरात प्रवास करते. कारमध्ये फ्रीज, चार पंखे, पाण्याची टाकी, झोपण्यासाठी, तसंच सामान ठेवण्यासाठी जागा आदी सुविधा आहेत. ही अनोखी स्कॉर्पिओ लक्षवेधी ठरली आहे.

काही वर्षांपूर्वी डेनी हॅबरर नेदरलॅंडहून भारत दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांना भारत खूप आवडला होता. त्यांनी भारतातली अनेक शहरं आणि पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर ते गोव्यातल्या एका मित्राच्या रेस्टॉरंटमध्ये त्याला मदत करू लागले; मात्र कोरोना महामारीनंतर त्यांचा दृष्टिकोन बदलला.

हेही वाचा - तुम्हीही ‘हेलिकॉप्टर पेरेंटिंग’ तर करत नाही ना? काय आहेत त्याचे फायदे आणि तोटे?

कारने करतात देशभरात प्रवास

`एसटी ऑटो`शी बोलताना डेनी यांनी सांगितलं, की `कोरोना महामारीमुळे काहीही होऊ शकतं याची मला जाणीव झाली. या देशात अशा इतर अनेक गोष्टी आहेत, ज्याकडे अजून लक्ष देण्याची गरज आहे, असं मला जाणवलं.`

पहिला लॉकडाउन संपल्यावर ते फिरण्यासाठी बाहेर पडले. आता ते या मॉडिफाइड एयूव्हीमधून देशभरात प्रवास करतात. `रोज हॉटेलमध्ये मुक्काम करणं किंवा टेंट लावून राहणं मुश्किल होतं. त्यामुळे मी स्कॉर्पिओचं रूपांतर मोटरहोममध्ये करण्याचा निर्णय घेतला,` असं डेनी यांनी सांगितलं.

कारमध्ये गरजेच्या वस्तूंचा समावेश

हॅबरर यांनी सांगितलं, `माझ्याकडे स्वतःचं मेडिकल किट  आणि ऑक्सिजन सिलिंडर आहे. रात्रीच्या वेळी मी माझ्या गाडीचे सर्व दरवाजे बंद करून ठेवतो. तसंच सुरक्षेच्या कारणास्तव खिडक्याही बंद करतो. व्हेंटिलेशनसाठी गाडीमध्ये चार पंखे आहेत. हे पंखे गाडीमधल्या बॅटरीवर चालतात. या गाडीमध्ये दोन व्यक्ती सहजपणे झोपू शकतील आणि सामान ठेवता येईल एवढी जागा आहे.`

कारमध्येच करतात स्वयंपाक

हॅबरर स्वयंपाकदेखील कारमध्येच करतात. `माझ्याकडे एक स्टोव्ह बर्नर आहे. गरजेचं साहित्य मी दुकानातून खरेदी करतो,` असं हॅबरर यांनी सांगितलं. कारमध्ये बॅटरीवर चालणारा एक फ्रीज आहे. डॅनी आंघोळीसह रोजची सर्व आवश्यक कामं कारमध्येच करतात. कारमध्ये पाण्याची एक छोटी टाकी बसवण्यात आली आहे. त्यात एकूण 75 लिटर पाणी साठतं. मात्र, बऱ्याचदा मला कपडे धुण्यासाठी एखाद्या हॉटेलमध्ये जावं लागतं, असं डॅनी सांगतात.

First published:

Tags: Tech news