मुंबई, 4 डिसेंबर : फोर्ड इंडिया (Ford India) या कार उत्पादक कंपनीने 4 डिसेंबर ते 6 डिसेंबर या कालवधीत 'मिडनाईट सरप्राईज' (Midnight Surprise) हा सेल जाहीर केला आहे. यामध्ये कंपनीने आपल्या फिगो, अस्पायर, फ़्रीस्टाईल, ईकोस्पोर्ट आणि एन्डेव्हर या कारवर पाच लाखांपर्यंतची सवलत आणि बक्षिसांची खैरात केली आहे.
या तीन दिवसांच्या कालावधीत फोर्डची कार बुक करणाऱ्या ग्राहकाला बक्षिसाची हमी देणारे एक डिजिटल स्क्रॅच कार्ड मिळणार आहे. बक्षिसांमध्ये एलईडी टीव्ही, डीशवॉशर, एअर प्युरीफायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, आय पॅड, आय फोन 11, ब्रँडेड सायकल, फिटनेस स्मार्टवॉचेस यासह 25 हजार रुपयांचे गिफ्ट कार्ड, 3 ते 5 ग्रॅमची सोन्याची नाणी आणि एक लाखाचे गोल्ड व्हाउचर यांचा समावेश आहे. याशिवाय डिसेंबरमध्ये डिलीव्हरी घेणाऱ्या ग्राहकांना 5 लाखांचे बंपर बक्षीस जिंकण्याचीही संधी आहे.
'पुन्हा मिडनाईट सरप्राईज सेल जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. या सेलद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना प्रत्येक फोर्ड कारच्या खरेदीबरोबर काहीतरी अधिक मिळवण्याची संधी देत आहोत,' असं फोर्ड इंडियाच्या मार्केटिंग, सेल्स आणि सर्व्हिस विभागाचे कार्यकारी संचालक विनय रैना यांनी सांगितलं.
‘सध्याच्या कोरोना साथीच्या काळात ग्राहकांना निश्चिंतपणे कार खरेदी करता यावी, यासाठी आम्ही सुरक्षा आणि सोयीला प्राधान्य दिले आहे. यासाठी ग्राहकांना कारचे बुकिंग करण्याकरता टोल फ्री क्रमांक 1800-419-3000 द्वारे डायल-ए-फोर्ड ही सुविधा उपलब्ध केली आहे.
यासह ग्राहकांना www.booking.india.ford.com या पोर्टलवरून ऑनलाईन बुकींगही करता येणार आहे. या सेलच्या कालावधीत देशभरातील सर्व फोर्ड डीलरशिप्स सकाळी 9 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार आहेत. यामुळे ग्राहकांना कार बुक करणे तसेच टेस्ट ड्राईव्ह घेणे यासाठी मुबलक वेळ मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोना साथीचा मोठा फटका वाहन उद्योगालाही बसला. आता स्थिती सुधारत असून, हळूहळू अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. दैनंदिन जीवनही पूर्ववत होत आहे. या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीला चालना देण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या आकर्षक सवलती देत आहेत. फोर्ड इंडियानेदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, या खास सेलचे आयोजन केले आहे. यामुळे कंपनीच्या कार विक्रीत वाढ होईल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.