मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

Save My Parking: पार्किंगमध्ये गाडी हरवली तर शोधून देईल गुगल, समजून घ्या सोपी पद्धत

Save My Parking: पार्किंगमध्ये गाडी हरवली तर शोधून देईल गुगल, समजून घ्या सोपी पद्धत

Save My Parking: पार्किंगमध्ये गाडी हरवली तर शोधून देईल गुगल, समजून घ्या सोपी पद्धत

Save My Parking: पार्किंगमध्ये गाडी हरवली तर शोधून देईल गुगल, समजून घ्या सोपी पद्धत

Google Maps Save my Parking: गुगल मॅप्सने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर जोडलं आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही पार्किंगची ठिकाणं चिन्हांकित करू शकता. त्यामुळं तुम्ही तुमची कार कुठं पार्क केली आहे किंवा तुम्हाला तुमची कार कुठे पार्क करायची आहे याचं टेंशन राहणार नाही.

पुढे वाचा ...
  • Published by:  Suraj Sakunde
मुंबई, 21 सप्टेंबर: अनेकदा लोक पार्किंगमध्ये कार लावतात. परंतु नंतर मात्र ती लवकर सापडत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. विशेषतः मॉल्सच्या पार्किंगमध्ये या समस्येचा अनुभव अनेकांना येतो. तुम्हीही कधी ना कधी या समस्येचा सामना केलाच असेल. अशा परिस्थितीत आता गुगलच्या मदतीनं तुम्ही हरवलेली कार पार्किंगमध्ये शोधू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कोणतंही खास फीचरची गरज लागणार नाही. तुम्ही गुगल मॅप्सवरुन (Google Maps) तुम्ही तुमची कार शोधू शकता. गुगल मॅप्सवरुन तुम्ही तुमची कार कशी शोधू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. गुगल मॅपने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन अॅप जोडलं आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही पार्किंगची ठिकाणं चिन्हांकित करू शकता. ते तुम्हाला तुमची कार कुठे पार्क केली आहे किंवा तुम्हाला तुमची कार कुठे पार्क करायची आहे याची आठवण करून देईल. या नवीन फीचरच्या मदतीनं तुम्ही सध्याचं लोकेशन सेव्ह करू शकता. पार्किंगसाठी या गोष्टी लक्षात ठेवा- यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे गुगल अॅप आणि गुगल मॅपचे अपडेटेड व्हर्जन असणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर लोकेशन सेवा एक्टिव्ह केली आहे की नाही हे देखील लक्षात ठेवा. याशिवाय गुगल असिस्टंटला सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या पाहिजेत. हेही वाचा: EV Range: लाँग ड्राईव्हलाही वापरू शकता इलेक्ट्रिक कार, फक्त लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय कार पार्किंगची जागा शोधू शकता. याशिवाय गुगल मॅप्स ही अशीच एक युक्ती आहे ज्याद्वारे तुम्ही तुमची कार काही मिनिटांत अनेक वाहनांमध्ये आरामात पार्क करू शकता. तुम्हाला तुमची कार किंवा इतर कोणतेही वाहन शोधायचे असेल तर तुम्ही यासाठी गुगल मॅपचीही मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त अॅप ओपन करावे लागेल आणि त्यानंतर सेव्ह पार्किंगच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. याशिवाय, तुम्ही डायरेक्शन पर्यायावरही टॅप करू शकता.
First published:

Tags: Car, Google

पुढील बातम्या