• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • Hero मध्ये सुरू आहे फेस्टिव धमाका! केवळ 6,999 रुपये देऊन घरी आणा बाईक्स आणि स्कूटर्स, मिळेल जबरदस्त ऑफर

Hero मध्ये सुरू आहे फेस्टिव धमाका! केवळ 6,999 रुपये देऊन घरी आणा बाईक्स आणि स्कूटर्स, मिळेल जबरदस्त ऑफर

सणासुदीच्या काळात, हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp Offers) आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. कंपनी आपल्या स्कूटर आणि बाईक्सच्या विस्तृत श्रेणीवर बंपर सवलत देत आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर: सध्या सणासुदीच्या काळात काहीतरी मोठी खरेदी (Festive Season Shopping) करण्याचा विचार अनेकांचा असतो. सणाच्या काळात वाहनांची देखील खरेदी केली जाते. तुम्ही यावर्षी बाईक्स किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 'हिरो' ही ऑटोमोबाइल कंपनी चांगल्यया ऑफर्स देत आहे. हिरो या प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनीकडून ग्राहकांना वेळोवेळी विविध ऑफर्स (Hero Festive Offers) दिल्या जातात.  या सणासुदीच्या काळात, हिरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp Offers) आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष ऑफर घेऊन आली आहे. कंपनी आपल्या स्कूटर आणि बाईक्सच्या विस्तृत श्रेणीवर बंपर सवलत देत आहे. हिरो स्प्लेंडर+ रेंज ते मेस्ट्रो स्कूटर पर्यंत सर्व वाहनांमध्ये ऑफर आहेत. एवढेच नव्हे तर या सणासुदीच्या काळात कंपनी ग्राहकांच्या सोयीसाठी बाईक, स्कूटर इत्यादी वाहनांच्या खरेदीवर आकर्षक फायनान्स देखील करत आहे. जाणून घ्या या ऑफर्सबद्दल.. फायनान्सवर आकर्षक सूट आता ग्राहक फायनान्स अंतर्गत 5.55% दराने वाहनांसाठी फायनान्स मिळवू शकतात. एवढेच नाही तर कंपनी ग्राहकांना 6,999 रुपयांचे डाउन पेमेंट देऊन नवीन बाईक किंवा स्कूटर घरी नेण्याची सुविधा देखील देत आहे. जर तुम्ही नवीन बाईक आणि स्कूटर खरेदी करत असाल तर तुम्ही 12,500 रुपयांपर्यंतच्या संपूर्ण बचतीचा लाभ घेऊ सुद्धा शकता. वाचा-सर्वात महागडी स्कूटर BMW C 400 GT भारतात लाँच, पाहा काय आहे किंमत आणि फीचर्स मिळेल भरभक्कम बोनस हिरो कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना आता वाहनांच्या खरेदीवर 5,000 रुपयांचा लॉयल्टी/एक्सचेंज बोनस मिळू शकतो. एवढेच नाही तर ग्राहकांना 2,100 रुपयांचा रोख डिस्काउंट मिळेल. जर ग्राहकांनी कार्डच्या माध्यमातून पेमेंट केले तर त्यांना यावर 7,500 रुपयांची ऑफर देखील मिळू शकते. वाचा-Aadhaar Card असेल तर काही Clicks वर मिळेल कर्ज, वाचा कशाप्रकारे कराल अप्लाय? कंपनी लवकरच अपडेट करणार वाहन पोर्टफोलिओ हिरो मोटोकॉर्प कंपनी लवकरच बाजारात आपल्या वाहनांचे पोर्टफोलिओ अपडेट करणार आहे. याबाबत तयारीही सुरू आहे. हिरो मोटोकॉर्प कंपनीने आगामी बाईकचा टीझर व्हिडीओ देखील जारी केला आहे. जो Xtreme 160R च्या स्टील्थ एडिशनशी संबंधित आहे. कंपनी लवकरच ही बाईक विक्रीसाठी आणणार आहे. यात काही खास नवीन फिचर्स देखील असणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे फीचर्स महत्त्वाचे ठरतील.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: