Explainer : यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये मोठा बदल; सर्वसामान्य ग्राहकांवर कसा होणार परिणाम?

Explainer : यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये मोठा बदल; सर्वसामान्य ग्राहकांवर कसा होणार परिणाम?

येत्या वर्षात या नवीन कॅप मुळे सर्वाधिक तोटा या दोन पेमेंट प्लॅटफॉर्म्सनां भोगावा लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर : भारतात डिजिटल पेमेंट स्पेस विशेषतः यूपीआय पेमेंट सर्व्हिसेसमध्ये एक मोठा बदल येणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांनी अधिकृत केले आहे की 1 जानेवारी, 2021 पासून एक नवीन कॅप लागू होणार आहे. यानुसार कोणताही थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर्सचा (TPAPs) यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेसच्या ट्रांजॅक्शनमधील वाटा 30% पेक्षा जास्त नसावा. यामुळे फोनपे, गूगल पे, पेटीएम आणि मोबिकविक, तसेच नव्याने लाँच झालेल्या व्हॉट्सअ‍ॅप पेसह अनेक कंपन्यांना मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. NCPI चा असा विश्वास आहे की याने यूपीआय इकोसिस्टीम संरक्षित राहील व त्यातील जोखिमा व्यवस्थित हाताळता येतील.

पण हे कॅप नक्की कसं मोजलं जाईल. NCPI सांगते की गेल्या 3 महिन्यांच्या एकूण यूपीआय ट्रांजॅक्शनच्या आधारे 30% कॅप मोजले जाईल. हे रोलिंग बेसिस वर होत राहील. ते असे ही सांगतात की कोणत्याही कंपनीची ट्रांजॅक्शन्स कॅप अमाउंट पेक्षा जास्त असल्यास त्यांना ते कमी करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी दिला जाईल. यामुळे फोनेपे आणि गुगल पे यांच्या धंद्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल कारण या दोन कंपनीचे यूपीआय ट्रांजॅक्शन्स एकूण यूपीआय व्यवहाराच्या जवळपास (प्रत्येकी) 40% इतके आहे. ही दिलेली धोरणे अमेझॉन पे, मी पे, सॅमसंग पे, ट्रूकॉलर आणि इतर यूपीआय कंपनींना ही लागू होतात.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या डेटानुसार ऑक्टोबरच्या महिन्यात यूपीआय ट्रांजॅक्शन्सनी 207 कोटी (2.7 अब्ज) इतका आकडा गाठला. हे ट्रांजॅक्शन्सची एकूण किंमत तब्बल 3.3 लाख कोटी रुपये इतकी आहे. यूपीआय ट्रांजॅक्शन्समध्ये हळूहळू वाढ होत आहे. सप्टेंबरच्या महिन्यात 180 कोटी यूपीआय ट्रांजॅक्शन्स झाली. ज्यांची एकूण किंमत 3.29 लाख कोटी रुपये इतकी आहे आणि ऑगस्ट महिन्यात 161 कोटी यूपीआय ट्रांजॅक्शन्स झाली. यूपीआय ट्रांजॅक्शन्समध्ये आलेल्या या निरंतर वाढीचे अनेक कारणं आहेत, ह्या कोरोना महामारीच्या काळात अनेक लोक हे घरबसल्या सणांसाठी खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ऑनलाइन वेबसाईट्सचा वापर करतात. पेमेंट करताना ऑनलाइन पेमेंट पर्याय म्हणून डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि यूपीआय हे दिले जातात, शिवाय मोबाईल वॉलेट्सचा ही पर्याय दिला जातो.

हे ही वाचा-असा WWF चा थरार तुम्ही कधी पाहिला नसेल, 2 उंदरांमधल्या भांडणाचा दुर्मीळ VIDEO

अलीकडेच या महिन्यात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे यांनी जाहीर केले की ऑक्टोबरच्या महिन्यात त्यांनी 250 दशलक्ष इतके युझर्सचा आकडा गाठला व त्यातील 100 दशलक्ष हे सक्रिय युझर्स असून त्यांनी 2.3 अब्ज अ‍ॅप सेशन्स वापरली. याने कळून येते की डिजिटल ट्रांजॅक्शन्सनी आजच्या युगात किती जोर पकडला आहे. फोनपे सांगतं की ऑक्टोबरमध्ये त्यांच्या अ‍ॅपवर 925 दशलक्ष ट्रांजॅक्शन्स केली गेली व सप्टेंबरच्या महिन्यात हा आकडा 750 दशलक्ष ट्रांजॅक्शन्स इतका होता. या डिजिटल प्लॅटफॉर्मचे मोठे आकडे हे भारतातील टायर 2 आणि टायर 3 शहरातून आले आहेत जिथल्या युझर्सनी एकूण ट्रांजॅक्शन्स 70% पेक्षा जास्त केल्या आहेत. फोनपे सांगतो की त्यांनी ऑक्टोबर त्यांच्या अ‍ॅपवर 835 दशलक्ष ट्रांजॅक्शन्स केलेल्या पहिल्या ज्या या महिन्याच्या एकूण यूपीआय ट्रांजॅक्शन्सचे 40% इतके शेअर आहे. NPCI च्या नोटिफिकेशनमधून एक गोष्ट स्पष्ट नाही झाली आहे, ती म्हणजे जर कोणतीही TPAP ट्रांजॅक्शन्सच्या बाबतीत दिलेल्या 30% कॅपच्या पुढे गेली तर काय होईल. "NPCI या संदर्भात लवकरच एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जाहीर करणार आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा-Dating App वापरताय तर सावधान! तुमचे खासगी चॅट, पेमेंट डिटेल्स चुकीच्या हातात

सध्या गुगल पे आणि फोनेपे यांची सुद्धा या बाबतची भूमिका स्पष्ट नाही. कारण येत्या वर्षात या नवीन कॅप मुळे सर्वाधिक तोटा या दोन पेमेंट प्लॅटफॉर्म्स ना भोगावा लागणार आहे. या धोरणांना पाळण्यासाठी त्यांना काही पर्याय निवडावे लागतील ज्यात ट्रांजॅक्शन्सच्या शेअर नुसार साइन अप लिमिट करणे, व्यक्ती-ते-व्यक्ती ट्रांजॅक्शन्स लिमिट करणे असे काही पर्याय आहेत जे कमी येतील. परंतु हे पर्याय वापरले जातीलच कि नाही याची काही खात्री नाही.

Published by: Meenal Gangurde
First published: November 7, 2020, 8:00 AM IST
Tags: upi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading