Home /News /auto-and-tech /

खूशखबर! Kia EV6 इलेक्ट्रिक कारचं भारतात Booking सुरू; फक्त 3 लाखात बुक; जाणून घ्या लाँचची तारीख

खूशखबर! Kia EV6 इलेक्ट्रिक कारचं भारतात Booking सुरू; फक्त 3 लाखात बुक; जाणून घ्या लाँचची तारीख

Kia EV6 इलेक्ट्रिक कार

Kia EV6 इलेक्ट्रिक कार

या कारच्या बेस व्हॅरिएंटची किंमत भारतात 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 45 लाखांपर्यंत जाऊ शकते.

  मुंबई, 26 मे: सध्या इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) ग्राहकांचा कल वाढला आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे इंधनाची बचत तर होतेच, शिवाय प्रदूषणदेखील कमी होतं. इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक कार्सदेखील बाजारात येत आहेत. यामुळे मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत किया ही कंपनीदेखील मागे नाही. कियाने इलेक्ट्रिक (Kia Electric) वाहनांच्या मार्केटमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. लकवरच किया आपली बहुप्रतिक्षित Kia EV6 ही इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही पहिलीच इलेक्ट्रिक कार असेल. (Kia's First Ever Electric Car) कियाने EV6 साठी भारतात 3 लाख रुपयांमध्ये बुकिंग सुरू केलं आहे. किया भारतात मर्यादित बॅचमध्ये EV6 आयात करणार असून, सुरुवातीला केवळ 100 युनिट्स उपलब्ध होणार आहेत. देशातल्या केवळ 12 शहरांमधल्या 15 निवडक डीलर्सद्वारे ही गाडी बुक करता येणार आहे. किया इंडिया जूनच्या पहिल्या आठवड्यात EV6 सादर करणार आहे. या कारच्या बेस व्हॅरिएंटची किंमत भारतात 30 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 45 लाखांपर्यंत जाऊ शकते. याबद्दलचं सविस्तर वृत्त 'झी न्यूज'ने प्रसिद्ध केलं आहे. Kia EV6 ही कार कंपनीच्या E-GMP या डेडिकेटेड EV प्लॅटफॉर्मवर आधारित आहे आणि ती ग्राहकांना प्रीमियम मोबिलिटी सोल्युशन्स ऑफर करते. Kia EV6 मधलं सर्व इंटीरियर ब्लॅक स्यूड सीट आणि व्हेगन लेदर बॉलस्टरसह काळ्या रंगाचं आहे. ही कार भारतात पाच कलर्समध्ये उपलब्ध होणार आहे. यात मूनस्केप, स्नो व्हाइट पर्ल, रनवे रेड, ऑरोरा ब्लॅक पर्ल आणि यॉट ब्लू या रंगांचा समावेश आहे. Spicejet च्या सिस्टमवर Cyber Attack, अनेक उड्डाणांवर परिणाम
  ग्राहक कारचं स्वागत करतील असा विश्वास - सीईओ किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताय-जिन-पार्क (Tae-Jin Park) म्हणाले, “भारतीय ऑटोमोटिव्ह उद्योग बदलत आहे आणि Kia या परिवर्तनात आघाडीवर आहे. वेळोवेळी आम्ही आमची जागतिक दर्जाची उत्पादनं आणि सेवांद्वारे हे सिद्ध केलं. EV6 हे बोल्ड डिझाइन, प्रगतीशील अभियांत्रिकी, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि जबरदस्त विद्युत कार्यक्षमतेचं एक उत्तम कॉम्बिनेशन आहे. आम्‍हाला खात्री आहे, की आमचे ग्राहक आम्‍ही बाजारात ऑफर करत असलेल्या दर्जेदार किया कारचं स्वागत करतील.”
  मल्टी-चार्जिंग सिस्टीम ही कार भारतात एक्सक्लुझिव्ह जीटी लाइन ट्रिममध्ये (Exclusive GT Line Trims) उपलब्ध असेल आणि ती मल्टी-चार्जिंग सिस्टीमसारख्या नावीन्यपूर्ण टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहे. ही जगातली पहिली अशी चार्जिंग सिस्टीम आहे, जी 400V आणि 800V दोन्ही चार्जरसह ऑपरेट करते आणि त्यासाठी अतिरिक्त कंट्रोलरची गरज भासत नाही. या कारचा 800 V चा चार्जर 350KWh च्या चार्जरचा वापर करून 18 मिनिटांत कार 10% ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकतो. EV6 ची क्षमता आणि वेग Kia EV6 ची भारतीय आवृत्ती 77.4 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते आणि ती 2WD मध्ये 229 PS इलेक्ट्रिक पॉवर आणि AWD प्रकारात 325 PS पॉवर जनरेट करते. एकदा चार्ज केल्यानंतर WLTP कम्बाइन्ड सायकलनुसार ही कार 528 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते. Kia EV6 कार 5.2 सेकंदांत 0 ते 100 किलोमीटर्स प्रतितास वेग पकडू शकते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. सुसज्ज केबिन Kia EV6 च्या केबिनमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यात पॅनोरॅमिक ड्युअल 31.24 cm (12.3”) कर्व्ह डिस्प्लेसह नेव्हिगेशन आणि ड्रायव्हिंग डेटा आणि व्हेइकल फंक्शनॅलिटी डिस्प्ले मिळतो. या कारमध्ये अ‍ॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (Advanced Driver Assistance System) असून, वाहनाच्या वेगाचे तपशील व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सूचनांसह Augmented Reality enabled HUD देखील मिळतं. Mumbai: मुंबईत दुचाकीवर मागे बसलेल्यालाही हेल्मेटसक्ती; अन्यथा दंडात्मक कारवाई
  EV6 मधली सुरक्षा फीचर्स Kia EV6 मध्ये सुरक्षिततेचीदेखील काळजी घेण्यात आली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने Kia EV6 मध्ये ऑल व्हील डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हेइकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSM), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (HAC), मल्टी कोलिजन ब्रेक असिस्ट (MCBA), अँटी-लॉक ब्रेक सिस्टीम (ABS), ब्रेक असिस्टंट सिस्टीम (BAS), इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS), फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड अँकरसह 8 एअरबॅग्ज (Air Bags) आहेत. एकंदरीत, या फीचर्सबद्दल कळल्यावर सर्वांना कारच्या प्रत्यक्ष लाँचिंगची उत्सुकता लागून राहिली आहे.
  First published:

  Tags: Car, Electric vehicles

  पुढील बातम्या