मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

इलेक्ट्रिक बाइक सर्वोत्तम की पेट्रोलवर चालणारी? तुमच्या शंकेवर A to Z उत्तर

इलेक्ट्रिक बाइक सर्वोत्तम की पेट्रोलवर चालणारी? तुमच्या शंकेवर A to Z उत्तर

गेल्या काही वर्षांत टू व्हीलरच्या सेगमेंटमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आता बाजारात पेट्रोलशिवाय चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटीजना सातत्यानं मागणी वाढत आहे.

गेल्या काही वर्षांत टू व्हीलरच्या सेगमेंटमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आता बाजारात पेट्रोलशिवाय चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटीजना सातत्यानं मागणी वाढत आहे.

गेल्या काही वर्षांत टू व्हीलरच्या सेगमेंटमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आता बाजारात पेट्रोलशिवाय चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटीजना सातत्यानं मागणी वाढत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

इंधनाचे दर (Fuel Price) सातत्यानं वाढत आहेत. दिवसेंदिवस वायुप्रदूषणही (Air pollution) वाढत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicle) खरेदीचा प्राधान्यानं विचार करत आहेत. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. भारतीय बाजारपेठेची गरज आणि मागणी ओळखून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक बाइक, स्कूटर आणि कार लॉंच करण्यास सुरुवात केली आहे; पण काही गोष्टींमुळे ग्राहकांच्या मनात इलेक्ट्रिक बाइक (Electric Bike) उत्तम की पेट्रोलवरील बाइक (Petrol Bike) असा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतं.

गेल्या काही वर्षांत टू व्हीलरच्या सेगमेंटमध्ये झपाट्याने बदल होताना दिसत आहे. आता बाजारात पेट्रोलशिवाय चालणाऱ्या म्हणजेच इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटीजना सातत्यानं मागणी वाढत आहे. बॅटरीवर (Battery) चालणाऱ्या बाइक अतिशय किफायशीर आहेत. तसंच त्या बाइकमुळे प्रदूषणदेखील होत नाही. या बाइक किंवा स्कूटी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. यात इलेक्ट्रिक बाइक जास्त काळ टिकू शकतात का, पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकच्या तुलनेत या बाइक चांगल्या आहेत की नाहीत यासह बऱ्याच प्रश्नांचा समावेश आहे.

या दोन्हींमधला फरक जाणून घेऊ या. त्यावरून तुमच्यासाठी कोणती बाइक योग्य आहे, हे तुम्ही ठरवू शकता.

इलेक्ट्रिक बाइक आणि पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकची किंमत

या दोन्ही बाइकमधला सर्वांत मोठा फरक म्हणजे किंमत होय. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकच्या तुलनेत इलेक्ट्रिक बाइकची किंमत जास्त आहे. इलेक्ट्रिक बाइकमध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. त्यामुळे या बाइकची किंमत तुलनेनं जास्त असते. तथापि, पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकची किंमत 70 हजार रुपयांपासून सुरू होते.

(सलाम! भारताच्या 'राईस मॅन'ची जगभरात ख्याती)

मायलेज आणि रेंज

पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकला 1 लिटरवर मायलेज (Mileage) मिळतं, तर इलेक्ट्रिक बाइकला एका चार्जमध्ये (Charge) एकूण मायलेज मिळतं. यानंतर बॅटरी पुन्हा चार्ज करावी लागते. त्यामुळे या बाइककरिता चार्जिंगची परिपूर्ण व्यवस्था गरजेची असते. अन्यथा इलेक्ट्रिक बाइक चालकासाठी त्रासदायक ठरू शकते.

चार्जिंग पॉइंटची घ्या काळजी

पेट्रोलवर चालणाऱ्या बाइकसाठी, ठिकठिकाणी पेट्रोल पंप (Petrol Pump) असतात. त्या ठिकाणी रायडर्स पेट्रोल भरू शकतात; पण इलेक्ट्रिक बाइक चार्ज करावी लागते. त्यामुळे एक गोष्ट ध्यानात घ्यावी की ज्या ठिकाणी चार्जिंग पॉइंट (Charging Point) आहे, त्या ठिकाणी वीज उपलब्ध असणं आवश्यक आहे, जेणेकरून बॅटरी सहज चार्ज करता येईल.

First published:

Tags: Bike, Electric vehicles