Home /News /auto-and-tech /

तिचा आवाज आणि ती.., काइनेटिक होंडाबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

तिचा आवाज आणि ती.., काइनेटिक होंडाबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का?

आज ज्या प्रकार अ‍ॅक्टिव्ह, स्कुटीला लोकं ओळखतात. त्या काळी काइनेटिकची ही तशीच ओळख होती.

    मुंबई, 13 जुलै : 'जून ते सोनं' असं नेहमी म्हटलं जातं. जुन्या वस्तू कितीही आपल्यापासून दूर झाल्या तरी त्यांची आठवण ही कायम स्मरणात राहते. 80 आणि 90 च्या दशकात कॉलेजचे तरुण, तरुणी म्हणा किंवा वयोवृद्ध प्रत्येकांची पहिली पसंती होती ती काइनेटिक होंडाला. काइनेटिक होंडा अशी स्कूटर होती ज्याला तोड नव्हता. कॉलेजमधील प्राध्यापक असो, विद्यार्थिनी असो किंवा मागच्या बाकावर बसणारे तीन  मित्र असो, प्रत्येकांचं पहिलं प्रेम हे काइनेटिक होंडाच होतं.  ही स्कूटर त्याकाळी प्रचंड लोकप्रिय झाली होती. कायनेटिक होंडा ही अशी गाडी होती, ती सर्व वयोगटातील व्यक्ती वापरू शकत होते. या गाडीला 1984 साली भारतात लाँच करण्यात आलं होतं. ही गाडी भारतीय कंपनी कायनेटिक जी फिरोदिया इंटरप्राईजेसची उपकंपनी होती. काइनेटिक आणि जपानी कंपनीने होंडाने मिळून ही काइनेटिक DX स्कूटर तयार केली होती. पण भारतात ही गाडी कायनेटिक म्हणूनच ओळखली जात होती. आज ज्या प्रकार अ‍ॅक्टिव्ह, स्कुटीला लोकं ओळखतात. त्या काळी काइनेटिकची ही तशीच ओळख होती. विशेष म्हणजे, या गाडीत सेल्फे स्टार्ट देण्यात आला होता. सेल्फ स्टार्ट देणारी ही भारतातील पहिली गाडी होती. या गाडीच्या इंजिनची गोष्ट केली तर यात 98 CC चे ट्रू स्ट्रोक पेट्रोल इंजिन दिले होते. यात 7.7bhp पॉवर मिळत होती. ही स्कूटर त्यावेळी जवळपास 40 किमी प्रतिलिटर मायलेज देत होते. त्यावेळी एका लिटरमध्ये 40 किमी मायलेज मिळणे ही फार मोठी गोष्ट होती. तब्बल 10 वर्षांनंतर काइनेटिकने ZX हे नवीन मॉडेल लाँच केले. यात रंग आणि बरेच नवीन बदल करण्यात आले होते. या स्कूटरलाही लोकांनी डोक्यावर घेतलं होतं. Lamborghini पहिली सुपर हायब्रिड कार लाँच, वेग 350 किमी प्रतितास आणि किंमत... 1984 साली ही गाडी लाँच झाली पण त्यानंतर कायनेटिक आणि होंडाने 1998 पर्यंत या स्कूटरचे उत्पादन काढले. पण, त्यानंतर दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या. त्यानंतर कायनेटिकने एकट्याने या स्कूटरचे उत्पादन सुरूच ठेवले होते.  त्याच काळात काइनेटिकला टक्कर देण्यासाठी बाजारात TVS स्कुटी लाँच झाली. TVS स्कुटी ही काइनेटिकपेक्षा हलकी आणि दिसायला आकर्षक होती. त्यामुळे TVS स्कुटीने बघता-बघता काइनेटिकची जागा घेऊन टाकली. त्यामुळे काइनेटिकने मार्केटमध्ये आपली जागा कायम राखण्यासाठी 2001 मध्ये ZX ZOOM लाँच केली. पण, त्यानंतर होंडाने आपली लोकप्रिय अॅक्टिव्हा लाँच केली. त्यानंतर काइनेटिकसाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पर्यायच उरला नाही. शेवटी काइनेटिकने फोर स्ट्रोक इंजिनमध्ये कायनेटिक 4X लाँच केली. पण, तरीही तिचा निभाव लागला नाही. त्यामुळे काइनेटिकचे बाजारातील मार्केट जवळपास संपुष्टात आले होते. इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठी बातमी, आता पेट्रोल पंपावरच मिळेल चार्ज बॅटरी! 2008 मध्ये काइनेटिकला उत्पादन थांबावे लागले. त्यानंतर महिद्रा आणि महिंद्राने कायनेटिक कंपनी विकत घेतली. पण, आजही या स्कूटरचे अनेक चाहते आहे. त्यांनी अजूनही ही स्कूटर सांभाळून ठेवली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या