मुंबई, 26 नोव्हेंबर: पूर्वी रस्त्यांवर एखादी कार जाताना दिसली की लोक त्या कारकडं कुतूहलानं पाहात राहायचे. पण अलीकडच्या काळात देशामध्ये कारच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. कारच्या संख्येबरोबरच अपघातांचं प्रमाणही वाढलं. अपघात झाल्यास कारमधील प्रवाशांचा जीव वाचावा यासाठी कारमध्ये सुरक्षा फीचर म्हणून एअरबॅग दिल्या जातात. वेगाबाबत तरुणांमध्येही या कारची प्रचंड क्रेझ आहे. कार खरेदी करताना लुक आणि डिझाईन तसेच फीचर्ससोबतच लोक तिचं स्पीडही तपासलं जातं. सर्वसामान्य लोक आपली कार जास्तीक जास्त 100 ते 200 किमी प्रतितास या वेगानं चालवतात. पण अनेक लक्झरी आणि स्पोर्ट्स कार देखील उपलब्ध आहेत, ज्या त्याहीपेक्षा खूपच वेगानं चालू शकतात. फॉर्म्युला वन कारचा वेग तर 300 ते 400 किमी प्रतितास इतका प्रचंड असतो. त्यांचा वेग जास्त असल्यानं अपघाताचा धोकाही जास्त असतो. परंतु असं असूनही त्यात एअर बॅग नसते.
F1 कारची किंमत करोडोंमध्ये-
लोकांच्या सुरक्षेचा विचार करून सरकारनं कारमध्ये एअर बॅग अनिवार्य केल्या आहेत. आता 5 ते 6 लाख रुपयांच्या कारमध्येही ते पाहायला मिळते. त्यामुळे अपघात झाल्यास लोकांचे प्राण वाचतात. फॉर्म्युला वन कारची किंमत 100 कोटींपर्यंत असते. असं असूनही त्यात एअर बॅगचा वापर केला जात नाही.
हेही वाचा: Electric Car: काय सांगता! 17 लाखांची Tata Nexon EV फक्त 4.9 लाखांत! कसे वाचतात पैसे? वाचा डिटेल्स
म्हणून फॉर्म्युला वन कारमध्ये एअरबॅग नसतात-
फॉर्म्युला वन कार चालवताना चालक जवळजवळ झोपलेल्या स्थितीत बसतात. याशिवाय डोक्यावर हेल्मेट घालण्याबरोबरच खांद्यावर संरक्षणासाठी बेल्टचा वापर केला जातो. सामान्य कारमध्ये, 2 किंवा 3 पॉइंट सीट बेल्ट वापरले जातात. पण फॉर्म्युला कारमध्ये 5 ते 6 पॉइंट सीट बेल्ट वापरतात. यामुळं कार चालवणारी व्यक्ती सीटवर पूर्णपणे चिकटलेली राहते. काही कारणानं अपघात झालाच तरी चालक समोरील बोनेट किंवा स्टेअरिंगला धडकत नाहीत.
6 पॉइंट सीट बेल्ट म्हणजे काय?
पूर्वी रेसिंग कारमध्ये फक्त 2 पॉइंट सीट बेल्ट वापरला जायचा. ड्रायव्हरला सीटवर बांधून ठेवण्यासाठी हे पुरेसं नव्हतं. आजच्या काळात येणाऱ्या सर्व वाहनांमध्ये 3 पॉइंट सीट बेल्ट वापरले जातात. सोप्या शब्दात, जिथे सीट बेल्ट वाहनाला जोडलेला असतो, त्याला पॉइंट म्हणतात. त्याचप्रमाणे एखाद्या वाहनाला 6 पॉइंट सीट बेल्ट असेल तर याचा अर्थ हा बेल्ट वाहनाला 6 ठिकाणी जोडलेला असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Car