Home /News /auto-and-tech /

कार घेण्याचा विचार करताय? देशातील सर्वात स्वस्त कारवर 40000 रुपयांची सूट, पाहा डिटेल्स

कार घेण्याचा विचार करताय? देशातील सर्वात स्वस्त कारवर 40000 रुपयांची सूट, पाहा डिटेल्स

मारुती सुझुकी ऑगस्ट महिन्यात आपल्या वेगवेगळ्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर करत आहे. यात Maruti Suzuki Alto कारवरही डिस्काउंट सामिल आहे.

  नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : मारुती सुझुकी ऑल्टो (Maruti Suzuki alto) देशातील सर्वात स्वस्त कार (Cheapest Car) आहे. आता ही कार आणखी स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. मारुती सुझुकी ऑगस्ट महिन्यात आपल्या वेगवेगळ्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर करत आहे. या Maruti Suzuki Alto कारवरही डिस्काउंट सामिल आहे. ग्राहक या कारवर 40 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकतात. Maruti Suzuki Alto Maruti Suzuki Alto ची सुरुवातीची किंमत 2.99 लाख रुपयांपासून सुरू होऊन 4.70 लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार पेट्रोल (Petrol) आणि सीएनजी (CNG) दोन्ही पर्यायात येते. कंपनी ऑगस्टमध्ये या कारच्या पेट्रोल वेरिएंटवर 25 हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक डिस्काउंट ऑफर (Cashback Discount) आहे. तर सीएनजी वेरिएंटवर 5 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट आहे. तसंच 15 हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही आहे.

  Driving License काढणं आता आणखी सोपं; सरकारने आणला नवा नियम

  या कारमध्ये 796cc चं पेट्रोल इंजिन मिळतं, जे 48 PS पॉवर आणि 69Nm टॉर्क जनरेट करतं. पेट्रोल वेरिएंट 22 किलोमीटर प्रतिलीटरपर्यंत मायलेज देतं. ही कार फॉक्ट्री-फिटेड सीएनजी पर्यायातही असून यात 41PS पॉवर आणि 60Nm पीक टॉर्क देते.

  Bike वर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम, असा करावा लागणार टू-व्हिलरवर प्रवास

  मारुती ऑल्टोच्या टॉप VXi+ वेरिएंटमध्ये Android Auto आणि Apple CarPlay सह 7 इंची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. यात कीलेस एन्ट्री आणि फ्रंट पॉवर विंडोदेखील आहे. सेफ्टीसाठी या कारमध्ये ड्रायव्हर साईड एअरबॅग, रिअर पार्किंग सेंसर आणि EBD सह ABS सारखे फीचर्स मिळतात. ही कार Renault Kwid आणि Datsun redi-GO साख्या गाड्यांना टक्कर देते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Discount offer, Maruti suzuki cars

  पुढील बातम्या